Sunday, June 14, 2026
Homeगुन्हारायसोनी नगरात घरफोडी; रोकड व दागिन्यांसह ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास

रायसोनी नगरात घरफोडी; रोकड व दागिन्यांसह ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास

रायसोनी नगरात घरफोडी; रोकड व दागिन्यांसह ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास

 

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील रायसोनी नगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोकड व सोने-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

महावितरणमध्ये कार्यरत असलेले पंकज सुरेश भावसार (वय ४१) हे आपल्या कुटुंबीयांसह १५ ते १८ मे दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे नातेवाइकांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर सलग तीन दिवस बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.चोरट्यांनी घरातील कपाट उघडून त्यामधील सुमारे ४० हजार रुपयांची रोकड तसेच सोने-चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे. भावसार कुटुंबीय परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या