Saturday, May 23, 2026
Homeजळगावसातोद कोरपावली रस्त्यावर ठेकेदाराच्या मनमानीमुळे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन २ ते ३ वेळा फुटून...

सातोद कोरपावली रस्त्यावर ठेकेदाराच्या मनमानीमुळे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन २ ते ३ वेळा फुटून लाखो लिटर पाणी वाया.

सातोद कोरपावली रस्त्यावर ठेकेदाराच्या मनमानीमुळे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन २ ते ३ वेळा फुटून लाखो लिटर पाणी वाया.

 

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि.२३

यावल तालुक्यातील सातोद कोरपावली रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराचा हलगर्जी, बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थांना पाणीपुरवठा होणारी पाईपलाईन दोन ते तीन वेळा फुटल्यामुळे पाणीपुरवठावर विपरीत परिणाम होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

सातोद कोरपावली रस्त्याचे काम सुरू आहे परंतु रस्त्याच्या बाजूने सातोद ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना जो पाणीपुरवठा केला जातो त्याची पाईपलाईन गेली आहे.ठेकेदाराच्या दुर्लक्षपणामुळे कामावरील मजूर हे रस्ता मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे तसेच नियोजनपूर्वक काम करीत नसल्याने पाणीपुरवठ्याची पाईपलाईन दोन ते तीन वेळा फुटून ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले.सदरची पाईपलाईन रस्त्याचे काम करणारे ठेकेदाराचे मजूर हे हे रस्त्याच्या कामासाठी जाणून बुजून पाईपलाईन फोडतात का.?असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित केला जात आहे तरी याप्रकरणी रस्त्याचे काम कोणत्या योजनेतून कोणत्या विभागामार्फत सुरू आहे आणि त्या विभागाचा संबंधित अधिकारी रस्त्याचे काम कशाप्रकारे सुरू आहे आहे किंवा नाही.? याची प्रत्यक्ष पाहणी,खात्री शासकीय देखभाल करीत आहे किंवा नाही याबाबत सुद्धा ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या