Saturday, May 23, 2026
Homeगुन्हातहसील कार्यालयाजवळ पोलिसांची धडक कारवाई : गावठी कट्ट्यासह तरूणाला अटक !

तहसील कार्यालयाजवळ पोलिसांची धडक कारवाई : गावठी कट्ट्यासह तरूणाला अटक !

तहसील कार्यालयाजवळ पोलिसांची धडक कारवाई : गावठी कट्ट्यासह तरूणाला अटक !

 

 

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – चोपडा शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत एका २२ वर्षीय युवकाला गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.२१) सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास शहरातील नवीन तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या कान्हा वाशिंग सेंटर परिसरात करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक गावठी कट्टा घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे समजताच चोपडा शहर पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. दरम्यान, दुर्गेश दिवाण पाटील (वय २२, रा. चोपडा) यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस व मोबाईल असा मुद्देमाल आढळून आला.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नीलेश वाघ यांच्या फिर्यादीवरून दुर्गेश पाटील याच्याविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, संदीप भोई, जगन्नाथ पाटील, विनोद पाटील, आकाश पाटील आणि नीलेश वाघ यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या