Wednesday, June 17, 2026
Homeजळगावमाकडांना - बांदरांना पाहून घेऊ ; ओला - सुका कचरा संकलन करणाऱ्या...

माकडांना – बांदरांना पाहून घेऊ ; ओला – सुका कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला मिळाले अभय !

दोन-तीन दिवसा आड कचरा संकलन.

यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – यावल शहरातील ओला व सुका घनकचरा संकलन करण्याचा ठेका एका ठेकेदाराला मिळाला आहे.परंतु ठेकेदाराला कचरा संकलन करून बिल वसूल करणे संदर्भात कोणाकडूनही अडथळा निर्माण होणार नाही तसेच या माकडांना / बांदरांना मी पाहून घेईन असा आशीर्वाद आणि अभय एका माहीतगार प्रभावशाली व्यक्तीकडून ( यावल नगरपरिषद अध्यक्षां आणि आणि सदस्य यांच्याकडून नव्हे बरं ) मिळाल्याने ठेकेदार आता दोन दोन, तीन तीन दिवसाच्या आड अनियमितपणे कचरा संकलन करीत असल्याने ठेकेदाराला आशीर्वाद देणारी व्यक्ती कोण.? तसेच आशीर्वाद देणारी व्यक्ती लोकप्रतिनिधीच्या संपर्कातील आहे का.? यावल नगर परिषद मधून बदली झालेला एक कर्मचारी यावल नगर परिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप का करीत आहे.? अशा प्रश्न यावल शहरात उपस्थित केला जात असल्याने यावलकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यावल नगरपालिकेमार्फत यावल शहरातील ओला व सुका घनकचरा संकलन करून कचरा डेपोवर नेऊन शासनाच्या अटी शर्तीनुसार ओला व सुका कचरा संकलन केलेल्या कचऱ्यावर शासनाच्या अटी शर्तीनुसार कचऱ्याचे विलगीकरण करून प्रक्रिया करणेबाबतचा ठेका बाहेरच्या जिल्ह्यातील एका ठेकेदाराला देण्यात आला आहे.हा ठेकेदार दर महिन्याला अंदाजे १५ ते २० लाख रुपयाचे बिल काढत असला तरी कचरा संकलन नियमित दररोज करीत नाही. घंटागाडी वाहनचालकासोबत एक सहाय्यक आवश्यक असताना यावल शहरात अनेक ठिकाणी फिरणाऱ्या घंटा गाडीवर फक्त चालक राहत असल्याने ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण केले जात नाही.तसेच वाहनात कचरा टाकताना महिला व पुरुषांना कचरा टाकणं जमत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रात झाडू मारून साफसफाई करणे, तसेच गटारी साफ सफाई करून कचरा काढून ट्रॅक्टर मध्ये भरून फेकणे ही ५० % कामे ठेकेदारा मार्फत केली जातात.तर हीच ५०% कामे नगरपरिषदेचे पर्मनंट कर्मचारी करतात.याच ठेकेदारांमार्फत होणारी कामे सुद्धा वेळेवर अनियमित होत असल्याने यावल शहरातील साफ-सफाईवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे.यावल नगर परिषद तत्कालीन स्थापत्य अभियंता सत्यम पाटील यांच्या कालावधीत ओला व सुका कचरा संकलन करण्याच्या ठेक्याची सुधारित प्रमा काढून कोणत्या नियमानुसार आणि तरतुदीने आदेशाने ठेक्यामध्ये लाखो रुपयांची वाढ केली.? याची चौकशी विद्यमान अध्यक्षां आणि सदस्यांसह लोकप्रतिनिधी,
अधिकाऱ्यांनी केल्यास यावल नगरपरिषद प्रशासकीय काळात आर्थिक व्यवहारांत,आणि अनेक काम-काजासह नगरपरिषदेतील रेकॉर्ड वर्षनिहाय विभागानुसार लावण्यात किती मलिदा मारला गेला.? यावल नगरपरिषद स्थापत्य अभियंता सत्यम पाटील हे यावल येथून फैजपूर परिषदेत बदली होऊन गेले असले तरी ते आजही यावल नगर परिषदेच्या कामकाजात पद्धतशीरपणे हस्तक्षेप करून आपला हेतू साध्य करून घेत आहे.सत्यम पाटील यांना कोणत्या तरी एका लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद असल्याची चर्चा असल्यामुळे सुद्धा यावल नगरपालिकेच्या कामकाजात विद्यमान अध्यक्ष आणि सदस्यांना विविध कामे करताना मोठी कसरत करावी लागत आहे.यावल नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत गवई हे कार्यालयीन वेळेत अनियमित उपस्थित रहात असल्याने सुद्धा नगरपरिषदेच्या कामकाजावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे.काही कर्मचारी बाहेर गावाहून ये- जा करीत असल्याने त्यांच्या कामकाजावर सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी जळगाव यांच्या नगरपरिषद विभागामार्फत यावल नगर परिषदेच्या प्रशासकीय काळातील सर्व विभागाच्या योजनांची,विविध कामांची, दिलेल्या बिलांसह चौकशी आणि ऑडिट केल्यास स्थापत्य अभियंता सत्यम पाटील यांच्या कार्यकाळात झालेली उधळपट्टीची आणि अनियमितपणा,बेकायदा कामे कशी झाली आहेत, तसेच सत्यम पाटील हे या आधी ज्या नगरपालिकेत कार्यरत होते त्या ठिकाणच्या कार्यालयीन आणि न्यायालयीन कामकाजाबाबतची माहिती जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही असे यावल व फैजपूर नगरपरिषद कार्यक्षेत्रात बोलले जात आहे.यावल नगरपरिषद अध्यक्षा, नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी घनकचरा ठेकेदाराकडून ठेका मंजूर करतानाच्या अटी शर्तीनुसार नियमित काम करून घेऊन ठेकेदार आपल्या मजुरांना वेळेवर आणि शासनाने निश्चित करून दिलेल्या रोजा नुसार मजुरांना वेतन देतो का.? ठेकेदार योग्य काम करणाऱ्या मजुरांना पूर्ण पेमेंट न देता कामावरून काढून टाकतो.? याची मजुरा मार्फत चौकशी करून मजुरांना शासन नियमानुसार वेतन देण्याबाबत कार्यवाही करावी अशी सुद्धा ठेकेदाराच्या मजूर वर्गातून मागणी होत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या