Tuesday, June 16, 2026
Homeजळगावबीव्हीजी आणि वॉटर ग्रेस कंपनीवर कारवाई करा : प्रमोद डोंगरे 

बीव्हीजी आणि वॉटर ग्रेस कंपनीवर कारवाई करा : प्रमोद डोंगरे 

बीव्हीजी आणि वॉटर ग्रेस कंपनीवर कारवाई करा : प्रमोद डोंगरे

 

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 दि.१६

बीव्हीजी आणि वॉटर ग्रेस कंपनीवर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे जळगाव शहर अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमुख डोंगरे यांच्यासह त्यांचे सहकारी कार्यकर्ते रवींद्र सपकाळे,रिंकू पाटील, सुनिता पाटील यांनी केली आहे.

 

जळगाव महापालिका आयुक्त आदित्य जीवते यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,

जळगाव शहर महापालिकेत कंत्राटी सफाई कामगार लोकांना कामगार कायद्यानुसार सुविधा दिल्या जात नाहीत नियुक्तीपत्र दिले जात नाही तसेच किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला जात नाही त्यांची किती दिवस

नियुक्ती केली आहे हे सुद्धा सांगितले जात नाही तसेच वर्तमान सफाई कंत्राटदार BVG कंपनी आणि मागील सफाई कंत्राटदार वाटरग्रेस कंपनी यांनी कंत्राटी सफाई कामगार लोकांच्या पगारातील ५० % रक्कम अपहार तथा दरमहा दिल्या जाणाऱ्या पगारी सुट्यांचे चार पाच दिवसांचे वेतन कपात करुन पगार देत आहे आणि दिला जात होता हा सर्व अपहार आणि भ्रष्टाचार वर्तमान कंपनी BVG आणि मागील वाटरग्रेस कंपनी यांनी ही तसाच भ्रष्टाचार केलेला आहे.याबाबतीत

माजी आयुक्त ज्ञानेशवर ढेरे यांना पत्र दिले होते पण त्यांनी कारवाई केली नाही त्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना पत्र दिले आहे त्यानंतर सहायक कामगार आयुक्त जळगाव यांना ही पत्र दिले आहे त्यानंतर विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम साहेब यांना ही पत्र दिले आहे तरीही कारवाई झालेली नाही तसेच आता मागील महिन्यात माझ्या वकीला मार्फत लिगल नोटीस पाठवली आहे जर १५ दिवसांत कारवाई केली नाही तर संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल तरी आपण जळगाव महापालिकेत दुसरे IASS अधिकारी आयुक्त म्हणून नियुक्त झाले आहात जळगाव महापालिकेत पाहिले IASS अधिकारी आयुक्त प्रवीण गेडाम हे भ्रष्टाचारावर कारवाई करुन जळगाव महापालिकेत शिस्त लावुन गेले होते तशीच आपण हि कारवाई करून IASS अधिकारी म्हणून ती परंपरा कायम ठेवावी आणि सफाई कंत्राटी कामगार लोकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती अन्यथा मला नाईलाजाने उच्च न्यायालयात न्याय मागणी कारवाई करावी लागेल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या