Wednesday, May 27, 2026
Homeजळगावसातपुड्यातील अतिदुर्ग भागात ७ दिवस मुक्काम करून रखरखत्या कडक उन्हात १९१ घरांची...

सातपुड्यातील अतिदुर्ग भागात ७ दिवस मुक्काम करून रखरखत्या कडक उन्हात १९१ घरांची जनगणना करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक. 

सातपुड्यातील अतिदुर्ग भागात ७ दिवस मुक्काम करून रखरखत्या कडक उन्हात १९१ घरांची जनगणना करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक.

 

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    दि.२७

सातपुड्यातील अतिदुर्गम आंबा पाणी भागात ७ दिवस मुक्काम करून रखरखत्या कडक उन्हात १९१ घरांची १०० % जनगणना पूर्ण करणाऱ्या शिक्षकांचे महसूल विभागातर्फे कौतुक होत आहे.

यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्या सूचनेनुसार

प्रशांत दिलीप पाटील सर एच.एल.बी. ०७१ आंबापाणी हा दहा ते पंधरा किलोमीटर परिसर रख रखत्या उन्हात ७ दिवस पायदळ फिरून एकूण इमारत संख्या १९१ या संपूर्ण घरांची जनगणना करून सर्व घरे शासन दप्तरी सिंक / वेळेत न चुकता नोंद केल्याने महसूल प्रशासनातर्फे प्रशांत पाटील सर यांचे कौतुक करण्यात येत आहे.

प्रशांत पाटील सर यांच्यासोबत सोबत कैलास पाटील सर असले तरी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत अविरतपणे जनगणना कामकाज. संपूर्ण कार्य करत असताना आदिवासी अतिदुर्ग भागातील आदिवासी बांधवांनी त्यांची जेवणाची व्यवस्था केली व शिक्षकांना सहकार्य केले मोबाईल नेटवर्क नाही त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाशी संपर्क नाही.हरिपुरा येथून १० किलोमीटर दूर अंतरावर जाऊन जनगणना केल्याने आदिवासी बांधवांसह महसूल विभागात त्यांचे कौतुक आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या