दहिगाव येथील एमएसएफ जवान विजय काळेचा चंद्रपूरच्या तलावात बुडून मृत्यू दहिगावात शोककळा.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दिनांक २७
तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील रहिवाशी एमएसएफ विजय काळे या जवानाचा चंद्रपूर येथे तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.२६ रोजी दुपारी घडली घटनेबाबत दहिगाव परिसरात शोककळा पसरली आहे,दहिगाव येथील विजय ओंकार काळे वय ३४ हा चंद्रपूर येथे महाराष्ट्र सेक्युरिटी फौज म्हणून कार्यरत होता.काल दि.२६ रोजी दुपारी तीन वाजेचे सुमारास तो आणि त्याचे मित्र तीन मिळून चंद्रपूर येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते,दोघे मित्र पाण्यात उतरले असता त्यांना वाचवण्याकरिता विजय काळे यांनी सुद्धा पोहण्यासाठी उडी टाकली,त्यात त्याला पाण्याचा अंदाज न समजल्याने तलावात बुडाला, त्याचा मृतदेह आज दि.२७ रोजी पहाटे पाण्यावर तरंगताना मिळून आला याबाबत चंद्रपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विजय काळे याचे पश्चात आई वडील पत्नी तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे या आठवड्यात दहिगाव मध्ये दोन दुर्घटना घडल्यात पहिल्या दुर्घटनेत २८ वर्षीय तरुण बाहुल्यावर बसण्याआधीच रोटावेटर मध्ये अडकून मयत झाला,तर दुसरा हा नवजवान तलावात बुडून मयत झाला आहे या घटनांमुळे गावावर शोककळा पसरली असून मोठा दुःखाचा डोंगर कुटुंबांवर कोसळला आहे.विजय हा गेल्या चार वर्षापासून एमएसएफ मध्ये कार्यरत होता.

