Monday, June 1, 2026
Homeजळगावजामनेर, भुसावळ, फैजपूर प्रांताधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात गौण खनिज वाहतुकीत गणेशाची मोठी कृपा...

जामनेर, भुसावळ, फैजपूर प्रांताधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात गौण खनिज वाहतुकीत गणेशाची मोठी कृपा आणि श्रद्धा.

जामनेर, भुसावळ, फैजपूर प्रांताधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात गौण खनिज वाहतुकीत गणेशाची मोठी कृपा आणि श्रद्धा

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क- जामनेर,भुसावळ,फैजपूर प्रांताधिकारी यांच्या क्षेत्रात गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीत संबंधितांवर गणेशाची मोठी कृपा आणि प्रभाव असल्याची संपूर्ण भुसावळ विभागात चर्चा आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,फैजपूर,भुसावळ,जामनेर प्रांताधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात गौण खनिज क्षेत्रात जागृत आणि प्रभावशाली असलेला गणेश याच्या श्रद्धेमुळे संबंधितांची मोठी आर्थिक प्रगती होत आहे.गणेशवरील श्रद्धा आणि आर्थिक अंधश्रद्धेमुळे फैजपूर,भुसावळ प्रांताधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातून पिवळ्या मातीचे उत्खनन करून जामनेर तालुक्यात रात्रंदिवस पिवळ्या मातीची वाहतूक अनेक डंपरच्या माध्यमातून सुरू आहे. फैजपूर भुसावळ करून डंपर मध्ये माती गेल्यानंतर जामनेर करून त्या डंपरमध्ये खडी, खडीचा बारीक कच, आणि बऱ्याच वेळेला वाळूची वाहतूक होत आहे.
एका बाजूने डंपर मध्ये टाकून मातीची वाहतूक आणि दुसऱ्या बाजूने उत्खनन केलेल्या गौण खनिजाची वाहतूक सुरू आहे यात महसूल विभागाची गणेशवर श्रद्धा असल्याने मोठी आर्थिक प्राप्ती होत असल्याचे गौण खनिज वाहतूकदारांमध्ये चर्चा आहे.एका बाजूने माती वाहतूक आणि त्याच वाहनातून दुसऱ्या बाजूने उत्खनन केलेल्या खडीची,बारीक कच, आणि वाळूची वाहतूक जी केली जात आहे. त्याची रॉयल्टी परमिट परवाना किती वाजता काढला आहे किंवा नाही हे गणेशाच्या महसूल भक्तांनाच माहीत असेल चर्चा भुसावळ विभागात आहे.
महसूलवरील गणेशाच्या भक्तीमुळे आणि आर्थिक प्रभावामुळे गणेश सोबत आणखी दुसऱ्या कोणत्या मोठ्या राजकीय लोकप्रतिनिधीचा किंवा नैसर्गिक दैविक शक्तीचा आशीर्वाद आहे का.? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात असून फैजपुर,भुसावळ,जामनेर प्रांताधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या महसूल विभागाच्या टीमने / भरारी पथकाने लक्ष केंद्रित करून एका बाजूने बेसुमार उत्खनन केलेल्या पिवळी माती वाहतूक आणि दुसऱ्या बाजूने बेसुमार उत्खनन केलेल्या खडी,
बारीक कच,वाळूची वाहतूक करताना परमिट त्याच प्रमाणे दिले आहे किंवा नाही याची चौकशी प्रांताधिकारी यांच्या महसूल पथकाने चौकशी केल्यास गौण खनिज वाहतुकीत ( १० व १२ चाकी डंपरचे ) गणेशचे अवैध गौण खनिज विघ्न दूर होईल अशी चर्चा भुसावळ विभागातील गौण खनिज व्यावसायिकांमध्ये सुरू आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या