Sunday, May 31, 2026
Homeगुन्हाघोडसगाव पुलाजवळ दरोड्याचा कट उधळला; दोन आरोपी जेरबंद

घोडसगाव पुलाजवळ दरोड्याचा कट उधळला; दोन आरोपी जेरबंद

घोडसगाव पुलाजवळ दरोड्याचा कट उधळला; दोन आरोपी जेरबंद

 

पहाटेची धाडसी कारवाई; पिस्तूल-काडतुसांसह टोळीचा पर्दाफाश

 

 

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी : धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील घोडसगाव पुलाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून तिघेजण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, लोखंडी रॉड, मिरची पावडर तसेच स्कॉर्पिओ वाहनासह सुमारे ५ लाख ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी असिम नजीरखा तडवी यांना २९ मे रोजी पहाटे ५.४२ वाजता घोडसगाव पुलाजवळ स्कॉर्पिओ वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांना पाहताच वाहनातील पाच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून दोन जणांना ताब्यात घेतले, तर तिघेजण शेतातील झाडी-झुडपांचा आधार घेत फरार झाले.अटक करण्यात आलेल्यांची ओळख चंद्रकांत विष्णू वाघ (वय ३०) व कैलास कारभारी घोडके (वय ३२, दोघे रा. चिंचोली आडगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी झाली आहे. चौकशीत फरार आरोपींची नावे प्रशांत उर्फ परशुराम मोहन गायकवाड (रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), तसेच शहादेव आणि किरण अशी असल्याचे निष्पन्न झाले.पंचांसमक्ष घेण्यात आलेल्या झडतीदरम्यान अपघातग्रस्त स्कॉर्पिओमधून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, १० फूट लांबीची दोरी, दोन लोखंडी रॉड, मिरची पावडरची पुडी, बनावट क्रमांक प्लेट आणि दोन मोबाईल फोन आढळून आले. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून वाहनासह पोलीस ठाण्यात आणले.

 

तपासादरम्यान फरार आरोपी प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड याच्याविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, दरोडा आणि दरोड्याच्या तयारीसारख्या गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

 

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या