Tuesday, June 2, 2026
Homeगुन्हागच्चीवर झोपलेल्या कुटुंबाच्या घरात मध्यरात्री चोरी : दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने...

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाच्या घरात मध्यरात्री चोरी : दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाच्या घरात मध्यरात्री चोरी : दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास !

 

 

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील वैष्णवी पार्क परिसरात मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. उकाड्यामुळे कुटुंबीय गच्चीवर झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना २४ मे रोजी घडली. याप्रकरणी ३० मे रोजी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादी सचिन रमेश भोई (वय ४२), व्यवसाय रिक्षाचालक, हे कुटुंबासह रात्री गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून तसेच लाकडी दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून १० ग्रॅम वजनाची सोनपोत, ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉगल तसेच चांदीचे दागिने असा एकूण १३ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

 

विशेष म्हणजे, घटनास्थळी चोरट्याची एक चप्पल आढळून आली आहे. चोरीनंतर घाईघाईत पसार होताना ती तेथे राहिली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांना महत्त्वाचा पुरावा मिळाल्याची शक्यता आहे.मध्यरात्री लघुशंकेसाठी उठल्यानंतर सचिन भोई यांच्या निदर्शनास घरफोडीचा प्रकार आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या