मा.शिक्षक आमदार श्री सत्यजित तांबे साहेब यांच्या हस्ते प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य (RTO)तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान.

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी फेकरी येथील राजेश निकम, श्री किशोर सपकाळे, शारदा शिक्षण मंडळ माध्यमिक शालेय समिती प्रमुख आ.श्री उन्मेषदादा पाटील, चेअरमन श्री स्वप्निल पाटील, यांचा कार्याचा गौरव )
फेकरी,ता.भुसावळ(वार्ताहर):दिनांक 31-05-2026, स्थळ :अल्पबचत भवन कलेक्टर ऑफिस जळगाव येथे प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षण भूषण पुरस्कार, आदर्श रत्न व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात राज्यभरातील 67 मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. भुसावळ तालुक्यातील पत्रकार राजेश निकम, तत्रज्ञ स्वप्निल पाटील, किशोर सपकाळे शारदा शिक्षण मंडळ, दीपनगरचे माध्यमिक शालेय प्रमुख आ.उन्मेष दादा पाटील, यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षण भूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले व शारदा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय दीपनगर येथील प्रा.श्री जी. व्ही. तायडे सर व कु.मनीषा भास्करराव पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. या भव्य सोहळ्यात मा.आमदार श्री सत्यजीत तांबे साहेब, रीजनल टीचर्स ऑरगॅनायजेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष आ.प्रा.श्री संजयजी काशिद सर, राज्य सल्लागार श्री प्रदीप सोनवणे सर, युवा सेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया ,श्री एच. जी. इंगळे सर, राज्य कार्याध्यक्ष गोविंदा पाटील,वसंत शिर्के, रणजित सोनवणे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रदीप सोनावणे यांनी केले व अहिल्याबाई होळकर यांची जयंती निमित्ताने कु.मनिषा पाटील मॅडम यांनी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षक

,समाजसेवक, डॉक्टर पत्रकार, वकील हे समाज परिवर्तनाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष आ.संजय काशिद सरांनी शिक्षक यांना सरकारने मोकळा श्वास घेऊ द्यावा व शिक्षकांना IMP दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सरकार दरबारी प्रयत्न करावा अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
फेकरी परिसरातील सर्वांना मिळालेल्या राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मुळे फेकरीची राज्यस्तरीय पातळीवर ओळख निर्माण झाली त्यामुळे आजच्या युवकां समोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.हा कार्यक्रम यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्ह्य़ातील सर्व जिल्हापदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांनी उत्तम रित्या सहकार्य केले.

