Wednesday, June 3, 2026
Homeजळगावमहाराष्ट्र ग्रामीण बँक यावल  क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते मयत व्यक्तीच्या...

महाराष्ट्र ग्रामीण बँक यावल  क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते मयत व्यक्तीच्या वारसास २ लाख रुपयांचा धनादेश वाटप.

महाराष्ट्र ग्रामीण बँक यावल  क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते मयत व्यक्तीच्या वारसास २ लाख रुपयांचा धनादेश वाटप.

 

 

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        दि.३   यावल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते बँकेचे एका मयत खातेदार / ग्राहक वारसाला २ लाख रुपयाचा धनादेश मदत देण्यात आला.

 

बँकेत मयत व्यक्ती खातेदार/ग्राहक अरुण नारायण न्हावी भुसावळ यांनी बँकेत खाते उघडले होते त्या प्रसंगी त्यांनी बँकेच्या सुविधा काय आहे एटीएम नेट बँकिंग तसेच विमा सुविधा अटल पेन्शन योजना सर्व माहिती घेऊन त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा काढून घेतला व काही दिवसानंतर त्यांची तब्येत खालावली व काही दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला त्यांचे वारस सुरेखा अरुण न्हावी यांनी विम्याचे डॉक्युमेंट महाराष्ट्र ग्रामीण बँक यावल येथे जमा केल्यानंतर काही दिवसांमध्ये एलआयसी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा वार्षिक प्रीमियम ४३६ मंजूर झाला विम्याची रक्कम २ लाख रुपयाचा धनादेश क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी व शाखा व्यवस्थापक सचिन सूर्यभान काकडे यांच्या हस्ते वारस सुरेखा अरुण न्हावी व त्यांचे नातलग रजनी बानाईत यांना वाटप करण्यात आला त्याप्रसंगी सहाय्यक व्यवस्थापक सौ.वैशाली नगराळे व जानवी खोडे व रोखपाल चेतनसिंह राजपूत तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मेसेंजर महेश दत्तात्रय खाचणे व निखिल बारी उपस्थित होते तसेच क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी यांनी त्याप्रसंगी असलेले खातेदारांना एलआयसी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा हा हा केवळ ४३६ रुपये व वीस रुपये वार्षिक प्रीमियम आहे तरी जे खातेदार विमा वंचित असतील त्यांनी विमा काढून घ्यावा असे सांगितले विमा अल्प स्वरूपाचा असून घरातील करता व्यक्ती मयत झाल्यास रक्कम दोन लाख रुपये हे कुटुंबास या रकमेचा फार मोठा आधार मिळतो महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सर्व स्टॉप हे नेहमी सर्व खातेदारांना विम्याची माहिती देत असतात तसेच गावोगावी काम घेऊन सर्व बँकेच्या सुविधा बद्दल माहिती देत असतात.तसेच सर्व प्रकारचे लोन कार लोन हाऊसिंग लोन गोल्ड लोन सर्व प्रकारचे लोन सुविधा उपलब्ध आहे तरी नागरिकांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक यावलला आवश्य भेट द्या असे आव्हान शाखा व्यवस्थापक सचिन सूर्यभान काकडे महाराष्ट्र ग्रामीण बँक यावल शाखा ५५०८ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या