Wednesday, June 3, 2026
Homeजळगावआदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात वर्ग - १ अधिकाऱ्यापेक्षा वर्ग ४ कर्मचाऱ्यांचा प्रभाव...

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात वर्ग – १ अधिकाऱ्यापेक्षा वर्ग ४ कर्मचाऱ्यांचा प्रभाव जास्त..?

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात वर्ग – १ अधिकाऱ्यापेक्षा वर्ग ४ कर्मचाऱ्यांचा प्रभाव जास्त..?

 

जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये चर्चा.

 

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              दि.३

जिल्हास्तरीय असलेल्या यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प वर्ग १ अधिकारी अरुण पवार यांच्या कार्यालयातील वर्ग ४ चा कर्मचारी पडोळे याचा जास्त प्रभाव संपूर्ण कार्यक्षेत्रात असल्याची चर्चा संपूर्ण आश्रम शाळातील शिक्षक व कर्मचारी वर्गात तसेच विविध कामांमधील संबंधितांमध्ये आहे.

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पडोळे नामक कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही अनुकंपा तत्त्वावर प्रयोगशाळा परिचर म्हणून होती आणि आहे परंतु आता हा कर्मचारी आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्याचा एक खास विश्वासू कार्यालयीन कर्मचारी असल्याने तो क्लर्क / लिपिक / किंवा प्रकल्प अधिकाऱ्याच्या वाहनावरील चालक आहे किंवा कसे.? आणि या कर्मचाऱ्यांचे स्वतःचे किंवा नातेवाईकांच्या नावावर जळगाव येथे डिजिटल लॅब,बियर बार फर्म असल्याची तसेच पडोळे हे रोज जळगाव पिंप्राळा परिसरातून यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ये – जा करतात की यावल येथे कागदोपत्री त्यांचे निवासस्थान दाखविले आहे.तसेच वर्ग -४ कर्मचाऱ्यांजवळ १ लाख १७ हजाराचा महागडा आय फोन मोबाईल आणि मुलगा परदेशात शिक्षणासाठी कोणत्या शासकीय योजनेतून आणि परवानगीने, आदेशाने गेलेला आहे इत्यादी अनेक प्रश्न आश्रम शाळांमध्ये उपस्थित केला जात आहे.

या वर्ग ४ कर्मचाऱ्यांचा प्रभाव जास्त असल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील अनेक आश्रम शाळाचे आणि इतर शासकीय योजनां राबविताना संबंधित ठेकेदारांकडून ठरलेली काही टक्केवारी कोणा-कोणापर्यंत कशी आणि कोणाला दिली जाते.? याबाबत ठेकेदारी वर्गात चर्चा आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रात काही ठिकाणी आश्रम शाळेत पत्नी वारल्यानंतर अनुकंपा तत्वावर पतीची नियुक्ती तर काही ठिकाणी पती वारल्यानंतर अनुकंपा तत्वावर पत्नीची नियुक्ती झाली आहे आणि दोघेही शासनाची दिशाभूल करत डोळे झाक करीत पद्धतशीरपणे पेन्शन घेऊन पुन्हा शासनाचा पगार घेत आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील काही ठराविक योजनांचा आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती मधील प्रकरणांचा आणि कर्मचाऱ्यांनी दरवर्षी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्थावर, आर्थिक मालमत्ते संदर्भात विवरण पत्र वस्तुस्थितीला धरून भरले / सादर केले आहे किंवा कसे.? याचा शोध लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालया तर्फे झाल्यास कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही अशी सुद्धा आदिवासी आश्रम शाळा सह आदिवासी विभागातील ठेकेदारी वर्गात चर्चा आहे.

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या शासकीय वाहनावर अधिकृत चालक कोण..? आणि बराच वेळेला शासकीय वाहनावर कार्यालयातील वर्ग ४ चा कर्मचारी चालक म्हणून कसा आणि कशासाठी.? कोणाच्या आदेशाने चालक म्हणून काम करतो.? याबाबत सुद्धा कार्यक्षेत्रात चर्चा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या