भारतीय स्टेट बँकेला रोख रक्कम आणताना सुरक्षा गार्डची गरज नाही.

खाजगी वाहनातून आणली जाते कॅश.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.३
भारतीय स्टेट बँक शाखा यावल या बँकेला आपल्या वरिष्ठ बँकेकडून रोख रक्कम आणताना सुरक्षा गार्ड / रक्षक आणि अधिकृत सुरक्षा रक्षका सहित वाहनाची गरज नसल्याचे आज प्रत्यक्ष दिसून आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल येथे स्टेट बँक शाखेत बँक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून कमी प्रमाणात कर्मचारी वर्ग आहे. अनेक वेळा अनेक ग्राहकांना बँकेने ठरवून दिलेल्या वेळेत बँकेतील कामे होत नसल्याने खातेदारांना,ठेवीदारांना बऱ्याच वेळेला बँकेने निश्चित केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागते,बँकेची काही महत्त्वाचे व्यवहार,कामे बँकेच्या वरिष्ठ शाखेकडून परवानगी मिळाल्याशिवाय होत नसल्याने अनेक खातेदारांमध्ये कर्जदारांमध्ये, ठेविदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बँकेचे एटीएम मशीन सतत बंद का असते.? याबाबत सुद्धा एटीएम कार्ड धारकांमध्ये चर्चा आहे.
यावल येथील स्टेट बँकची अशी परिस्थिती असताना बँकेचे सर्व प्रकारचे खातेदार,ठेवीदार यांनी गर्दी करू नये म्हणून बँकेच्या प्रवेशद्वाराजवळच सुरक्षा गार्ड नियुक्त केला आहे.बऱ्याच वेळेला सुरक्षारक्षकाला सुरक्षेचे काम सोडून बँके अंतर्गत इतर कामे करताना खातेदारांना दिसून येते.
याचप्रमाणे यावल स्टेट बँक शाखेत आज बुधवार दि.३ रोजी बँकेच्या कार्यालयीन सकाळच्या वेळेत एका खाजगी क्रुझर वाहनातून मोठी कॅश असलेली एक पेटी आणण्यात आली त्यावेळी त्या वाहनात कोणताही सुरक्षा हत्यार / बंदूक नसलेला सुरक्षा गार्ड नव्हता त्यामुळे स्टेट बँक शाखा यावल यांना कॅश आणताना सुरक्षा रक्षकाची गरज नाही का.? असा प्रश्न उपस्थित होत असून एखाद्या वेळेस अप्रिय घटना घडल्यास याला कोण जबाबदार राहणार..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

