भुसावळ घरफोडी प्रकरणात तीन आंतरराज्यीय आरोपींना अटक; मुद्देमाल जप्त

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव आणि नागपूर शहर पोलिसांच्या घरफोडी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत तीन आंतरराज्यीय आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 287/2026 (BNS 2023 कलम 305(A), 331(1), 331(3)) अंतर्गत तपास सुरू असताना CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून संशयित आरोपींची ओळख पटवण्यात आली. आरोपी भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातील बालाजी लॉज आणि आसपासच्या भागात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचे लोकेशन नागपूर येथील गणेशपेठ परिसरात आढळून आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने माहिती नागपूर पोलिसांच्या पथकाला दिली. त्यावर तत्काळ कारवाई करत घरफोडी विरोधी पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजेश पारस शहा (52, बिहार) भोला उर्फ बिरेंदर सुखदेव पासवान (40, बिहार)जसपालसिंग राजू (42, हरियाणा)
यांचा समावेश आहे.

झडतीदरम्यान आरोपींकडून भुसावळ येथील गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींना नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी करत असून या आंतरराज्यीय टोळीच्या इतर संभाव्य गुन्ह्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदरची कार्यवाही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, श्री. संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक श्री. केदार बारबोले उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उप निरीक्षक/शरद बागल, पोहेकॉ/गोपाळ गव्हाणे, पोहेकॉ/उमाकांत पाटील, पोना/विकास सातदिवे पोकों/प्रशांत परदेशी पोकों/राहुल वानखेडेया पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

