Wednesday, June 17, 2026
Homeजळगावघन कचरा प्रकल्पातील हलगर्जीपणा बाबत विरोधी नगरसेवक आक्रमक. 

घन कचरा प्रकल्पातील हलगर्जीपणा बाबत विरोधी नगरसेवक आक्रमक. 

घन कचरा प्रकल्पातील हलगर्जीपणा बाबत विरोधी नगरसेवक आक्रमक.

 

यावल शहरातील व्यापाऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया.

 

यावल.   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          दि.४

यावल नगर परिषद राबवित असलेल्या घनकचरा प्रकल्पात दिशा एजन्सीज् सुपरवायझर यांच्या कामातील हलगर्जीपणा बाबत आणि यावल शहरात ओला व सुका कचरा अनियमित संकलित केला जात असल्याबाबत यावल नगर परिषदेच्या विरोधी गटातील सदस्यांनी यावल शहरातील काही ठराविक व्यापाऱ्यांच्या व्हिडिओ शूटिंगसह प्रतिक्रिया घेऊन आक्रमक भूमिका घेतली.

 

यावल नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी दि. ३ जून २०२६ रोजी यावल नगर परिषदेचा घनकचरा प्रकल्प राबविणारा पुणे येथील ठेकेदार दिशा एजन्सीज् याला दिलेल्या नोटीस समज पत्रात नमूद केले आहे की दि. ३ जून २०२६ रोजी सौ.वर्षा नीरज चोपडे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) गट नेते तथा नगरसेविका या.न.प.भाजप गट नेते तथा नगरसेविका

सौ.नंदा राजेंद्र महाजन,भाजप नगरसेविका सौ.सविता विजय नन्नवरे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) शहर कार्याध्यक्ष कदीर खान,जुगल पाटील उपजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट ) व इतर कार्यकर्ते यांनी नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत घनकचरा प्रकल्प केंद्र गट क्र. १६३४ येथे भेट दिली असता तेथे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत असल्याचे आढळून आले नाही.सदर ठिकाणी

कचऱ्याने ढीग जसेच्या तसे जमा दिसून आले.तसेच जमा असलेल्या कचरा जळत असल्याचे आढळून आले.आपल्याकडे करारनाम्या नुसार सोपविलेले सर्व मशीनरी नादुरुस्त व बंद स्वरूपात आढळून आल्या.तसेच संपूर्ण शहरात भेट देऊन पंचनामा केला असता शहरात कचऱ्याचे ढीग पडून आहेत त्याच बरोबर नागरिकांना विचारणा केली असता व्यापारी वर्गातील मेन रोड,गवत बाजार ते बारी चौक सकाळ संध्याकाळ

कचरा संकलन करणेकरीता वाहन थांबत नाही व गटारीतला कचरा ७-८ दिवस उचलला जात नाही तसेच रहिवाशी भागात सुद्धा नागरिकांच्या घंटागाडी न येणे बाबत यावल नगरपरिषदेच्या आरोग्य सुविधा प्रणाली बाबत

नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.

तसेच वेळोवेळी दिलेल्या अंतिम नॉटिशीचा खुलासा व १-३२ मुद्यांची माहिती असमाधानकारक असल्याने आपला खुलासा अमान्य करण्यात येत आहे.

 

तरी आज रोजी वरील घटनेची परिस्थिति बघता वरील गटनेते, राजकीय पदाधिकारी, व्यापारी वर्ग व सामान्य नागरिकांचा रोष बघता करार नाम्याचा भंग झाल्याचे दिसून येत आहे. तरी आपणाविरुद्ध काळ्या

यादीत टाकण्याची कारवाई प्रस्तावित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. असे दिलेल्या नोटीस समाज पत्रात नमूद करण्यात आले असले तरी यावल नगर परिषदेतील विरोधी गटाने सत्ताधारी गटाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याने पुढील कार्यवाही काय होते.? याकडे संपूर्ण यावलकरांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या