एसटी बस वर्धापन दिनानिमित्त आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी ज्येष्ठ प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन केले स्वागत.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.५
एस.टी.बसचा ७८ वा वाढदिवस यावल एस.टी. बस स्थानकात नुकताच साजरा करण्यात आला यानिमित्ताने आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी केक कापून जेष्ठ प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी एस.टी.बस सजवून बसचे पूजन तालुक्यातील साकळी येथील ज्येष्ठ प्रवाशी रघुनाथ पांडुरंग महाजन ( वय -७८) यांच्या हस्ते करण्यात आले, बस स्थानकावर रांगोळी तोरण पताका लावून सुंदर लक्षवेधी सजावट करण्यात आली यावेळी आगारातील बस मधील बसलेले प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.यावेळी सरस्वती विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक भारुडे सर यांनी प्रवाशी बांधवांना एसटी बसच्या सुखकर प्रवासाबद्दल प्रबोधन केले..तसेच आगारातील कर्मचारी यांचेकडून प्रवाशी बांधवांना सरबत वाटप करण्यात आले व केक कापून एस.टी.चा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन,तेजस शुक्ल ( सहायक कार्यशाळा अधीक्षक ), निलेश महाजन ( वाहतूक निरीक्षक ), ईश्वर चौधरी ( आगार लेखाकार ),वाहतूक नियंत्रक संदीप जोशी,वाहन परीक्षक संजय सावकारे,दिलीप ठाकरे,संदीप पाटील,अतुल चौधरी,प्रकाश रावते,मीना तडवी, सुनीता भावसार,समता वानखेडे शारदा आसवले,रवींद्र ठाकरे,दीपक गुरव व मोठ्या संख्येने रा.प.कर्मचारी व रा. प.प्रवाशी हजर होते.

