शहरात ७ जुन रोजी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.५
यावल शहरात रविवार दि.७ जुन रोजी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन होत असल्याने प्रा.मुकेश येवले, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळासह शहरातील भक्तगणाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट या न्यासाच्या वतीने अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी
-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रातील गावो गावी असलेल्या स्वामी भक्ताना दर्शन करतायावे यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-
पादुका परिक्रमेचे आयोजन केले आहे तसेच अन्यकारणास्थव दुरवरच्या अबाल वृद्ध,महिला व स्वामी भक्ताना श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी इच्छा असुनही स्वामींच्या मूळस्थानी अक्कलकोट येथे येता येत नाही अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच आपल्या भक्तगणांच्या गावी येत आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळा दि. ७ जून रोजी यावल
शहरामध्ये संध्याकाळी ५.३०
वाजता धनश्री टॉकीज बोरावल गेट यावल येथे आगमन होत आहे त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा होऊन यावल शहराच्या मुख्य रस्त्यावरून सवाद्य मिरवणूक ही बोरावल गेट,गवत बाजार,अपना बाजार,महाजन टी. डेपो,चावडी मार्ग कोर्ट रोड,
रेणुकादेवी मंदिर,शिवाजीनगर येथे प्रा.मुकेश येवले यांच्या निवासस्थानी संध्या ७ वाजता महापूजा,आरती व महाप्रसाद होऊन श्रींच्या पालखीचे मुक्काम असणार आहे या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन प्रा.मुकेश येवले व त्यांचा परिवार सलग १७ वर्षापासून करीत आहे.सोमवार
दि.८ जून रोजी सकाळी ६ वाजता श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे अभिषेक होणार आहे व त्यानंतर श्रींच्या पालखीचे प्रस्थान फैजपूर येथे होणार असून श्री स्वामी समर्थ महाराज्यांच्या पालखीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक प्रा.मुकेश येवले व श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळातर्फे केले आहे.

