जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप किनगाव-साकळी मंडळातर्फे वृक्षारोपण संपन्न.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.५
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी किनगाव-साकळी मंडळाच्या वतीने मंडळ अध्यक्ष अनिल पाटील व जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचे संयोजक तेजस धनंजय पाटील, सहसंयोजक दिनेश पाटील व महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सौखेडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आली.यावेळी रवींद्र सूर्यभान पाटील,प्रभाकर आप्पा सोनवणे,देविदास धांगो पाटील, अरुण शामराव पाटील,वामन सोनवने,डॉ.सुनील पाटील,सुनील बाबुलाल नेवे,सुनील बडगुजर, मयूर पाटील,राहुल पाटील,अक्षय पाटील,निलेश पाटील,भूषण पाटील,रोहित पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प केला.तसेच सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेत वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.वाढते प्रदूषण,हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे जतन करावे असे आवाहन यावेळी संयोजक तेजस धनंजय पाटील यांनी केले करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी किनगाव-साकळी मंडळाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविला.सर्वांचे आभार मंडळ अध्यक्ष अनिल पाटील यांनी मानले.

