Friday, June 5, 2026
Homeजळगावजिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सातपुडा आदिवासी क्षेत्रात मुक्कामी राहून आदिवासींच्या समस्या जाणून...

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सातपुडा आदिवासी क्षेत्रात मुक्कामी राहून आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या.

यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जळगाव जिल्ह्याचे तरुण तडफदार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी काल गुरुवार दि.४ रोजी सातपुडा जंगलात म्हणजे यावल तालुका कार्यक्षेत्रात संध्याकाळी आपल्या महसूल पथकासह भेट देऊन रात्रभर मुक्काम करून आदिवासी बांधवांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या आणि विविध उपाय योजना बाबत उपस्थित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
नाशिक वनपरिक्षेत्रेय अधिकारी भवर, यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर,रावेर तहसीलदार श्रीमती दिपा जेधे, जामन्या वनक्षेत्रपाल दुसाने, यावल येथील एपीओ, सावखेडे मंडळ अधिकारी व तलाठी जामन्या,उसमळी,लंगडाआंबा यांची समवेत सातपुडा यांच्यासोबत सातपुडा रांगांमध्ये वसलेल्या यावल तालुक्यातील जामन्या,गाडऱ्या, उसमळी व लंगडाआंबा येथील मुक्कामी गाव भेट दिली.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या महसूल पथकासह दिलेल्या भेटी दरम्यान सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत दि. ४ जून २०२६ रोजी संध्याकाळी ८:३० वाजता जामन्या येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या प्रांगणात गाडऱ्या,जामन्या, उसमळी आणि लंगडाआंबा येथील ग्रामस्थांसोबत सविस्तर चर्चा करीत त्यांच्या समस्या जाणून त्यांना काही सूचना सुद्धा दिल्या.

ग्रामस्थांसोबत महत्त्वाच्या चर्चा – रेशन धान्य दुकानांबाबत,

आरोग्य विभाग – जामन्या येथील आरोग्य उपकेंद्र,रस्त्याचा प्रश्न- पाल ते माथन आणि वाघझिरा ते लंगडांआंबा रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण होतो.दळणवळणासाठी एखादी मिनी बस चालू करावे.शेत शिवार रस्ते पानंद मध्ये घेऊन काम पूर्ण करावे,CFR जो मंजूर झालेला आहे त्यानुसार मृद व जलसंधारण तसेच इतर कामे करण्यात यावे,नरेगा मधून रोजगार प्राप्त करून द्यावा,डिंक,चारोळी, बांबू अशा उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे,बांबू लागवड आणि त्याच्यातून उत्पन्न यासाठी चंद्रपूर येथे अभ्यास दौरा आयोजित करणे.शेल्फवर जी कामे आहेत ते ग्रामसेवक आणि फॉरेस्ट यांच्या माध्यमातून पूर्ण करणे,गावासाठी सिंचन साहित्य, कृषी योजना,एन.बी.स्कीम,शबरी मधून स्पाइस क्लस्टर,घरकुल उपलब्ध करून देणे,घरकुलाचे एकूण ४४ पैकी सातच प्रस्ताव मंजूर झालेले आहेत उरलेले प्रस्ताव प्रलंबित आधार सीडींग मुळे पूर्ण झालेली नाही याबाबत चर्चा झाली.
गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र उपलब्ध करून द्यावे.कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्धवट साहित्य वाटप झालेले आहे ते पूर्ण मिळणे.यावर जिल्हाधिकारी महोदय यांनी संपूर्ण गाव सोलर युक्त करणे, चारी गावांसाठी मिळून आपले सरकार सेवा केंद्र देणे, रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणे,आरोग्य उपकेंद्राला योग्य त्या सूचना केल्या ४ जून रोजी संध्याकाळी ९:३० वाजता जिल्हाधिकारी महोदय जामन्या येथील आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन पाहणीकेली आणि संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.शुक्रवार दि.५ जून रोजी सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत यावल वनविभाग परीक्षेतील लंगडा आंबा येथील फॉरेस्ट प्लांटेशन आणि वन विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली.पर्यावरण दिनानिमित्त लंगडा आंबा रेस्ट हाऊस परिसरात आदिवासी बांधवांच्या आणि महसूल, वनविभाग अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत सिताफळ व इतर रोपे वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.सकाळी ९ वाजता जामन्या येथील स्वस्त धान्य रेशन दुकानात भेट देऊन दप्तराची व उपलब्ध धान्याची तपासणी केली.आणि योग्य ते निर्देश दिले.त्यानंतर सकाळी ९:३० वाजता आश्रम शाळा जामन्या येथे भेट देण्यात आली आणि संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात आलेसकाळी ९:४५ वाजता जिल्हा परिषद शाळा पाझर तलाव येथे भेट दिली आणि संबंधित शिक्षकांचा गुणगौरव करून तेथील इमारतीचे बांधकाम आणि डागडुजी करण्यासाठी आश्वस्त करण्यात आले.सदर दौऱ्यामध्ये लंगडाआंबा, उसमळी आणि जामण्या येथे बसविण्यात आलेले बीएसएनएलचे टॉवर यांची पाहणी करून नेटवर्क एरियामध्ये सदर टॉवरमुळे नेटवर्क कनेक्टिव्हिटी आली का याची समक्ष चाचणी घेतली.जिल्हाधिकारी यांनी दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व कामांचा पुनःश्च आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा एक ते दीड महिन्याने या परिसरात भेट देण्याचे आश्वस्त केले.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या