Friday, June 5, 2026
Homeजळगावजागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल मंडळातर्फे वृक्षारोपण. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल मंडळातर्फे वृक्षारोपण. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल मंडळातर्फे वृक्षारोपण.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  दि.५   येथील भारतीय जनता पार्टी मंडळ यावल तर्फे आमदार अमोल दादा जावळे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावल येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन अजय भालेराव व रितेश बारी यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ठिकठिकाणी वृक्षांची लागवड करीत वृक्षारोपण केले.

यावेळी प्रभाकर सोनवणे,न.पा. उप गटनेते राकेश कोलते, नगरसेवक रुबाब तडवी,भूषण फेगडे,मुकेश कोळी,बबलू येवले, मनोज धनगर,कोमल इंगळे, उज्वल कानडे,चेतन आढळकर,

सागर इंगळे,पराग देशमुख,गुंजन फेगडे आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प केला.तसेच सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेत वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली.

कार्यक्रमात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.वाढते प्रदूषण,हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे जतन करावे असे आवाहन यावेळी संयोजक अजय भालेराव यांनी केले.

या वृक्षारोपण कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी यावल मंडळाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविला.सर्वांचे आभार संयोजक रितेश बारी यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या