Friday, June 5, 2026
Homeआरोग्यप्लास्टिकविरोधी मोहिमेत महापालिकेची धडक कारवाई

प्लास्टिकविरोधी मोहिमेत महापालिकेची धडक कारवाई

प्लास्टिकविरोधी मोहिमेत महापालिकेची धडक कारवाई

१९ ठिकाणी एकाचवेळी तपासणी; ६० हजारांचा दंड, २९३ किलो प्लास्टिक जप्त

जळगाव :  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी (४ जून) प्लास्टिक उत्पादक व विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या कारवाईत २९३ किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व पर्यावरणपूरक नसलेल्या प्लास्टिकसदृश वस्तू जप्त करण्यात आल्या असून संबंधित विक्रेत्यांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

यापूर्वी महापालिकेच्या कारवाईची माहिती काही विक्रेत्यांना आगाऊ मिळत असल्याने ते कारवाईपासून बचाव करत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे आरोग्य विभागाने तपासणीचे नियोजन बदलत यावेळी एकाचवेळी शहरातील १९ ठिकाणी छापेमारी केली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे विक्रेत्यांना कोणतीही पूर्वतयारी करण्याची संधी मिळाली नाही.

तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य आढळून आले. पथकाने २९३ किलो प्लास्टिक पिशव्या आणि पर्यावरणाला हानीकारक प्लास्टिकसदृश वस्तू जप्त केल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून एकूण ६० हजार रुपयांचा आर्थिक दंड वसूल करण्यात आला.

महापालिकेकडून शहरात प्लास्टिकमुक्ती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या