तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी कोण..?

आमदार जावळे यांचा निर्णय महत्वाचा ठरणार…
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.७
यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमन,व्हाईस चेअरमन यांनी राजीनामा दिला असल्याने शुक्रवार दि.१२ जून रोजी चेअरमन निवड करण्यासाठी संचालक मंडळाची सभा निश्चित केल्याने शेतकी संघाच्या चेअरमन व्हाईट चेअरमन पदाच्या निवड प्रक्रियेत आमदार जावळे यांचा मार्गदर्शक निर्णय महत्वाचा ठरणार असल्याने याकडे शेतकी संघ संचालक मंडळासह तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात विद्यमान संचालक म्हणून पांडुरंग सराफ, अतुल भालेराव,उमेश फेगडे,नरेंद्र नारखेडे,हेमराज फेगडे,धनंजय फिरके,प्रवीण वारके डॉ.नरेंद्र कोल्हे, सुनील नेवे,प्रशांत चौधरी, सागर महाजन,नारायण चौधरी, तुषार पाटील,तेजस पाटील,अतुल पाटील,सौ.आरती महाजन सौ. नयना चौधरी,हिरालाल चौधरी, सुनील बाबूलाल नेवे आहेत. भारतीय जनता पार्टीचे बहुमत आणि वर्चस्व असल्याने जिनिंग प्रेस सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनपदी,जाणकार असलेल्या किव्वा फारसा अनुभव नसलेल्या संचालकांपैकी कोणाची निवड संचालक मंडळातून केली जाते.आणि निवड करताना आमदार अमोलदादा जावळे यांचा मार्गदर्शनपर निर्णयामुळे कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

