तालुक्यात भूदान शेतजमीन खरेदीसाठी बेकायदा

नाहरकत दाखला दिला असल्याने चौकशी सुरू.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.८ तालुक्यात १८ वर्षांपूर्वी असलेल्या तत्कालीन तहसीलदाराने यावल तालुक्यातील शेत गट नंबर शेत जमिनीवर भूदान शेत जमिनीची नोंद असताना खरेदी करण्यासाठी नाहरकत दाखला दिला असल्याने नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू झाली आहे.
यावल तालुक्यातील एका शेत गट क्रं.वर भूदान समिती नोंद तसेच हक्कात “सर्व सेवा भुदान समितीचे हितसंबंध सदर जमिनीस लागु राहील” हा शेरा असतांना आणि “पुनर्वसन अधिनियम
१९९९” चे कलम १२ मधील तरतुदी प्रमाणे जमिनीचे हस्तांतरण पोट विभागणी, विभाजन,रुपांतरण किंवा सुधारणा यावर निर्बंध हे शेरे असतांना तत्कालीन तहसिलदार यांनी दि. २९/०८/२००८ रोजी सदरची शेत
जमिन विक्रीसाठी बेकायदेशीर नाहरकत दाखला दिलेला आहे. तरी याबाबत सखोल चौकशी करून त्यांच्यावर वरील
विषयाप्रमाणे तात्काळ कारवाई करणेबाबत नाशिक विभागीय कार्यालयातून जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत फैजपूर प्रांताधिकारी यांच्याकडे चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात कारवाई सुरू झाली.
या आदेशाच्या संदर्भान्वये जळगाव येथील निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी फैजपूर यांच्याकडून स्वयंस्पष्ट अहवाल उलट टपाली सादर करण्याचे कळविल्याने यावल तालुक्यात कारवाई झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील इतरही काही प्रकरणे उघडकीस येणार असल्याची चर्चा आहे.

