Friday, June 12, 2026
Homeगुन्हाबालकामगारांकडून काम करून घेतल्याप्रकरणी टी हाऊस मालकाविरुद्ध गुन्हा

बालकामगारांकडून काम करून घेतल्याप्रकरणी टी हाऊस मालकाविरुद्ध गुन्हा

बालकामगारांकडून काम करून घेतल्याप्रकरणी टी हाऊस मालकाविरुद्ध गुन्हा

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील मेणबत्ती चौक परिसरातील न्यू बापू टी हाऊसमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी मालकाविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अशोक नगर येथील राहुल भगवान महाजन (वय ३८) यांच्यावर बालकामगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल महाजन यांनी न्यू बापू टी हाऊसमध्ये १७ आणि १५ वर्षे वयोगटातील दोन अल्पवयीन मुलांना कामावर ठेवले होते. या मुलांकडून नियमांपेक्षा अधिक वेळ काम करून घेतले जात होते. तसेच त्यांना योग्य वेतन, राहण्याची व्यवस्था, जेवणाची सुविधा आणि आवश्यक सुरक्षा पुरविण्यात आली नसल्याचे तपासात समोर आले आहे.

याशिवाय, कामावर ठेवलेल्या मुलांची कोणतीही हजेरी नोंद किंवा वेतन नोंदवही ठेवण्यात आली नव्हती. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षणही उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. संबंधित मुलांचे शोषण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही अल्पवयीन मुलांची सुटका केली.

सुटका करण्यात आलेल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या