यावलकरांच्या बौद्धिक भोजनासाठी साकारतेय वाचनालय.

नगराध्यक्षां सौ.छायाताई पाटील यांच्याकडून कामाची पाहणी.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१३
यावल शहरामध्ये पांडुरंग सराफ नगर गट नंबर ७८७ मधील खुल्या भूखंडावर भव्य असे स्पर्धा परीक्षा केंद व अभ्यासिका इत्यादी बौद्धिक क्षमता वाढीसाठी (बौद्धिक भोजनासाठी ) अत्याधुनिक वाचनालय साकारले जात आहे.सुरू असलेल्या या कामाची पाहणी नगराध्यक्षां सौ. छायाताई पाटील आणि सहकारी नगरसेवकांनी केली.
विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हे काम नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असून या कामाची पाहणी आज नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील व सहकारी नगरसेवक यांनी केली असून कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की यावल नगरपालिकेच्या वतीने येथील पांडुरंग सराफ नगर भागातील गट नंबर ७८७ वरील खुल्या भूखंडावर भव्य असे स्पर्धा परीक्षा केंद व अभ्यासिका साकारली जात असून सुमारे चाळीस विद्यार्थी केंद्रात बसून अभ्यास करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सदरचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून सी.सी.टीव्ही कॅमेरे व खुर्ची बसविण्याचे काम बाकी आहे.अत्यंत हवेशीर व प्रशस्त अशा इमारतीमध्ये येऊन त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठीचे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.या कामामुळे यावल शहरातील व परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपयोगात आणता येणार आहे.या अभ्यासिकेत पुढील दोन-तीन महिन्यात पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.या कामाची पाहणी आज येथील नगराध्यक्षा सौ. छायाताई पाटील यांनी केली त्यावेळी त्यांचेसोबत बांधकाम अभियंता संग्राम शेळके, नगरसेवक अतुल पाटील,सागर चौधरी,पराग सराफ यांचेसह उमेश धनगर सर,मनोज करणकर,गौरव चौधरी,शुभम सैंदाने उपस्थित होते.

