शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

भुसावळ: खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील संतोषी माता हॉल शेजारील मैदानावर सहा जून ते 14 जून दरम्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व जय मातृभूमी क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती शक्ती आखाडा नशिराबादच्या सहकार्याने शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण वर्गात 130 पेक्षा अधिक प्रशिक्षणातील सहभागी झाले त्यात मुलींची संख्या लक्षणीय होती.
या शिबिराच्या समारोपप्रसंगी डी वाय एस पी बारबोले साहेब, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रकाश काका विसपुते, दिनकर जी जावळे, व्यापारी असोसिएशनचे राधेश्याम भाऊ लाहोटी, श्याम दरगड, जळगाव जनता बँक चे संचालक जयंती भाऊ सुराणा, गोदावरी हॉस्पिटल चे डॉ.वैभव पाटील, भुसावळ येथील डॉ. सुरज भोळे, डॉ प्रशांत जावळे, डॉ.स्नेहल जावळे, शिवप्रतिष्ठानचे आकाशजी फडे, संतोषी माता बँक चे वासू भाऊ इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रितेश सुभाष जैन यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री वरून वासुदेव इंगळे यांनी केले या

कार्यक्रमाकरिता श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी व जय मातृभूमी क्रीडा मंडळ यांच्या खेळाडूंनी यांनी मदत केली.
शिबिरात आशिष जी खेरे राहणार रायगड यांनी प्रशिक्षण दिले. प् भक्ती शक्ती शिवकालीन आखाडा यांच्या देखरेखी सदर शिबिर संपन्न झाला झाले. याप्रसंगी नऊ दिवस ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्या सर्व प्रशिक्षणार्थीने व नशिराबाद येथील भक्ती शक्ती शिवकालीन आखाडा यांच्या कुशल खेळाडूंनी प्रात्यक्षिक सादर केले.

