Tuesday, June 16, 2026
Homeजळगावयेथील जे.टी.महाजन इंग्लिल स्कुल शाळेच्या पहिला दिवस मोठ्या उसाहावात साजरा.

येथील जे.टी.महाजन इंग्लिल स्कुल शाळेच्या पहिला दिवस मोठ्या उसाहावात साजरा.

येथील जे.टी.महाजन इंग्लिल स्कुल शाळेच्या पहिला दिवस मोठ्या उसाहावात साजरा.

 

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              दि.१५   यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल शाळेचा आज

दि.१५ रोजी पहिला दिवस प्रवेश उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करण्यात आला.

 

याप्रसंगी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष अशी लक्षवेधी तयारी करून विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशी आनंददायी वातावरण प्रवेश केला.

 

शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि स्मरणीय वातावरण केल्यास यांचा उत्साह द्विगुण होईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे सकारात्मक सुरुवात होईल या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थी प्रवेश कार्यक्रमाचे अध्यक्षपद सौ.रंजना महाजन मॅडम यांनी स्वीकारले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जे.टी.महाजन आय. टी.आय कॉलेज चे प्राचार्य गिरीश वाघुळदे सर तसेच आय.टी.आय चे प्रवीण झोपे सर इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम तसेच पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम व गौरी भिरूड मॅडम यांनी उपस्थित होते.

मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात केली .

सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे औषण करून विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊ वाटप करण्यात आला.विद्यार्थ्यांना मनोरंजनासाठी संगतीचा तालावर नाच केला.व शैक्षणिक आनंद व्यक्त केला.

अशा प्रकारे शाळेच्या पहिला दिवस उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या