Monday, June 15, 2026
Homeजळगावबाल संस्कार विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न.

बाल संस्कार विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न.

बाल संस्कार विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न.

 

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    येथील बाल संस्कार विद्या मंदिर मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ निमित्त प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी बालवाडी व इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन,औक्षण करून व टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

 

कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांना मिठाई व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष महेशभाऊ वाणी यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व त्यात पुस्तक वितरण करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर, बालवाडी मुख्याध्यापिका कवडीवाले मॅडम तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.उपस्थितमान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित अध्ययन,शिस्त व संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.

प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थी,पालक व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.नवागत विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात शिक्षणाची सुरुवात करून देण्याचा शाळेचा उद्देश या कार्यक्रमातून सफल झाल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या