समर्थ दिव्यांग संस्थेतर्फे २५ दिव्यांग भगिनींची उज्जैन,ओंकारेश्वरला मोफत तिर्थयात्रा.

आय.जी.जैन यांच्या कडून दोन क्रूझर वाहनांची व्यवस्था.
दिव्यांग भाविक भुसावळातून उत्साहात रवाना;
मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि16
येथील समर्थ दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकतीच २५ दिव्यांग भगिनींची ‘उज्जैन महाकाल व ओंकारेश्वर’ या पवित्र धार्मिक स्थळांची तिर्थयात्रा आयोजित करण्यात आली होती. भुसावळचे प्रसिद्ध समर्थ दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे
सेक्रेटरी आय.जी.जैन यांनी या सर्व भाविकांसाठी दोन क्रूझर गाड्यांद्वारे या मोफत यात्रेची विशेष व्यवस्था केली होती.
या धार्मिक सहली दरम्यान सर्व दिव्यांग भाविक उज्जैन येथील प्रसिद्ध बाबा महाकालेश्वर तसेच परिसरातील इतर मंदिरांचे दर्शन घेणार आहेत. तसेच तेथील परिक्रमा आणि महाआरती मध्येही हे भाविक मोठ्या उत्साहाने सामील होणार आहेत.
मान्यवरांच्या हस्ते स्वागत व सदिच्छा.
या यात्रेकरूंना भुसावळ येथून रवाना करताना नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विनोद शर्मा,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे.बी.कोटेचा आणि सुनिल पुरोहित आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आय. जी.जैन व सर्व दिव्यांग भाविकांना पुष्पगुच्छ देऊन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
‘बम बम भोले’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
प्रवासाला सुरुवात करताना सर्व दिव्यांग भाविक भगिनींनी आणि उपस्थित नागरिकांनी ‘बम बम भोले’ आणि ‘भोले बाबा की जय हो’ अशा घोषणा दिल्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. दिव्यांग भगिनींना मोफत तीर्थयात्रा घडवून आणण्याबद्दल त्यांनी आय.जी.जैन यांचे विशेष आभार मानले.
या प्रसंगी विनोद शर्मा,जे बी कोटेचा,रवींद्र ठाकूर,पंकज महाजन,पंकज जैन,दीपक सेतवाल,दिनेश मोची,सरला पाटील,भारती पाटील,मोना शिंदे,कविता जैन,विनोद गायकवाड,लता कोलते,दीपक कुळकर्णी,बबीता शर्मा,राहुल चोपडे,करुणा सातदिवे,रंजना गरुळ, अशोक सुकीया,गोकुळ बाविस्कर,हेमंत पाटील, पल्लवी बानाईते,शांताराम बानाईते,जीनाझा जैन यांच्यासह इतर दिव्यांग भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

