जिल्ह्यातील शालेय क्रीडापटूंना राष्ट्रीय खेळात सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार .


वरणगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – राज्यस्तरीय अधिकृत ग्रॅपलिंग (मल्लयुद्ध) संस्थेच्या जिल्हा कार्यकारीणीची नाशिक येथे नुकतीच निवड संपन्न झाली . हि निवड राज्य ग्रॅपलिंग संस्थेच्या अध्यक्षा अर्चना देशमुख व राज्य सचिव संतोष देशमुख सर यांनी जाहिर केली.
सदर संस्थेच्या अध्यक्षपदी वरणगाव येथिल सेवानिवृत्त सैनिक पैलवान संजय बावस्कर याची निवड करण्यात आली . असून उपाध्यक्ष पदी पैलवान उत्तम भोई ,सचिव पैलवान दिलीप संगेले सहसचीव: बाळासाहेब चव्हाण, कोषाध्यक्ष प्रणय बावस्कर ,तर सदस्यपदी महेन्द्र इंगळे ,सतिष मोरे , राजकिरण निकम , जितेन्द्र मोरे, इत्यादींची निवड जाहीर करण्यात आली आहे .या संस्थेतर्फे दिनांक ११ व १२ जुलै २०२६ दरम्यान ईश्म स्पोर्ट्स अँड फिटनेस क्लब, विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे पंचपरिक्षा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन ,या सेमिनारमधे शालेय जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये अधिकृत रेफ्री म्हणून काम करण्याची संधी, राज्य संघटनेच्या अधिकृत स्पर्धा व टेक्निकल कमिटीमध्ये सहभागाची संधी ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कोर्ससाठी पात्रता प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होणार असुन अनुभवी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंचांचे मार्गदर्शन मिळणार आहे . डब्ल्यू डब्ल्यू ग्रॅपलिंगचे अद्ययावत नियम व नियमन व ग्रॅपलिंग (मल्लयुद्ध) खेळाची सखोल माहिती प्रात्यक्षिक प्रशिक्षण व त्यानंतर लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल त्यासाठी सर्व खेळांतील वरिष्ठ खेळाडू क्रीडा शिक्षक प्रशिक्षक, कोच, ट्रेनर ग्रॅपलिंग व मल्लयुद्ध खेळात आवड असणारे सर्व महिला व पुरुष यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
यात सहभागींना राज्यस्तरीय रेफ्री डिप्लोमा प्रमाणपत्र, राज्यस्तरीय रेफ्री लायसन्स, अधिकृत राज्यस्तरीय रेफ्री टी-शर्ट मिळणार आहे .

