मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी वरणगावात मोर्चा

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ :
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर खोटे फोटो प्रसारित करून बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप करत संबंधित सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी वरणगाव येथे मोर्चा काढण्यात आला.
लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर वरणगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. निवेदनात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या कथित खोट्या व दिशाभूल करणाऱ्या सामग्रीमुळे मंत्री महाजन यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन स्वीकारताना वरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित बागुल यांनी प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात येईल व आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष सुनील माळी, तालुकाध्यक्ष शामराव धनगर, मिलिंद भाईसे, कुंदन माळी, तेजस जैन, आकाश निमकर, अन्सारी, रमेश पालवे, फझल भाई, अजमल भाई, हितेश चौधरी, कमलाकर मराठे, राहुल वंजारी, गणेश चौधरी, बळीराम सोनवणे, नामदेव मोरे, दत्तात्रय सूर्यवंशी, शालिग्राम पैसे, आयुब खान, दुर्गेश राजपूत, मयूर शेळके, जगन कोळी, साबीर कुरेशी, अरुण बावणे, छोटू सेवतकर, के. जी. अमृते, डॉ. सादिक शेख, पंकज चौधरी, संदीप माळी, नदीम शेख, मुन्ना लपलीकर, राहुल जंजाळे, डी. के. खाटिक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास मंत्री महाजन यांच्या समर्थकांचा भव्य मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष सुनील काळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना दिला.

