Wednesday, June 24, 2026
Homeजळगावनगर परिषदेत नियम बाह्य हजेरी पुस्तकावर शेरा आणि नियम बाह्य प्रभारी मुकादम.

नगर परिषदेत नियम बाह्य हजेरी पुस्तकावर शेरा आणि नियम बाह्य प्रभारी मुकादम.

नगर परिषदेत नियम बाह्य हजेरी पुस्तकावर शेरा आणि नियम बाह्य प्रभारी मुकादम.

 

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                   दि.२४

यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी नियम बाह्य हजेरी पुस्तकावर शेरा मारून नियम बाह्य प्रभारी मुकादम पदभार दिला असल्याची तक्रार नगरपरिषदेच्या सफाई महिला कर्मचारी कल्पना बबलू घारू यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिल्याने चौकशी अंती काय निष्पन्न होते याकडे यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

मंगळवार दि.२३ रोजी जिल्हाधिकारी जळगाव ( नगर विकास शाखा ) यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की यावल नगरपरिषदेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असून मी जून महिन्यात कामावर हजर असून नियमबाह्य हजेरी पुस्तकावर शेरा लिहिण्यात आला आहे.माझ्या सोबत बाकी कर्मचारी यांनी सुद्धा हजेरी पुस्तकावर सही केलेली नव्हती परंतु मला मानसिक त्रास देणे साठी नियम बाह्य हजेरी पुस्तकावर शेरा लिहिला असून सदर शेरा लिहिणाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी.तसेच यावल नगरपरिषद मध्ये माझा प्रभारी मुकादम पदभार काढून घेण्यात आला असून माझ्या एवजी सिनिरेटी यादी मध्ये खाली असलेल्या व शिक्षण पात्रता नसलेल्या कर्मचाऱ्याला बेकायदेशीररित्या प्रभारी मुकादम पदभार देण्यात आला आहे. शासन परिपत्रक ५ सप्टेंबर २०१८ च्या नुसार वरिष्ठालाडावलून (आणि शैक्षणिक पात्रता सुद्धा नसताना ) कनिष्ठाला पदभार देणे हा प्रशासकीय भ्रष्टाचार केला असल्याने कारवाई करून मला न्याय मिळावा अशी मागणी कल्पना बबलू घारू या सफाई कामगार महिलेने केल्याने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध काय कारवाई होते.? याकडे यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या