Wednesday, June 24, 2026
Homeजळगावफुलगांव रेल्वे साईड रस्त्यांचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे;

फुलगांव रेल्वे साईड रस्त्यांचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे;

फुलगांव रेल्वे साईड रस्त्यांचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे;

ग्रामपंचायत सदस्याची तक्रार

 

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

दिपनगर येथील फुलगाव-रेल्वे साईड रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील यांनी केली आहे. फुलगाव ते दिपनगर या मार्गावर रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूंना शेत-रस्ते आणि गावांना जोडणारे अनेक रस्ता-दुर्गम भाग आहेत. दिपनगर प्रशासना तर्फे या रस्त्यांचे डांबरीकरण कार्य चालू आहे, परंतु तंत्रमान व गुणवत्तेबाबत शंका उपस्थित केल्या आहेत.

 

Oplus_131072

सचिन पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्याचे काम नितळ व टिकाऊ दिसत केवळ पातळ टाकून रस्ता आणि ठेकेदाराला गुणवत्ता संदर्भातील इस्टिमेट विचारले असता तो अस्पष्ट किंवा टाळाटाळ करणारे उत्तर देतो. त्यामुळे या रस्त्यांचे पुन्हा लवकरच खराब होण्याची शक्यता आहे, असा आरोप पाटील यांनी केला. त्यांनी योग्य न तपासता ठेकेदाराच्या बिलांची देयके काढू नयेत, असेही म्हटले आहे.

 

Oplus_131072

तक्रारीमध्ये मागणी करण्यात आली आहे की दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे तत्काळ लक्ष द्यावे, कामाची गुणवत्ता तपासून आवश्यक असल्यास ठेकेदारावर दुरुस्ती आदेश व जबाबदारी घ्यावी. स्थानिक रहिवाशांना आणि शेतकऱ्यांना भविष्यात या रस्त्यांमुळे अडचणी येऊ नयेत यासाठी काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या