Friday, June 26, 2026
Homeजळगावबामणोद येथे पंढरपूर पायी वारीचे भव्य स्वागत . आमदार साहेबांची उपस्थिती

बामणोद येथे पंढरपूर पायी वारीचे भव्य स्वागत . आमदार साहेबांची उपस्थिती

बामणोद येथे पंढरपूर पायी वारीचे भव्य स्वागत . आमदार साहेबांची उपस्थिती :-                           यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    बामणोद ता. यावल खांदेशातील थोर वारकरी दिगंबर महाराज चिनावलकर यांची पंढरपूर पायी वारी खानापूर येथून बुधवार रोजी निघुन आज शुक्रवार रोजी सकाळी बामणोद येथे आगमन झाले . या प्रसंगी यावल रावेरचे आमदार अमोल जावळे उपस्थित होते .

 

Oplus_131072

पायी वारीचे बामणोद येथे आगमन झाल्यावर आमदार अमोल जावळे यांनी दिंडी प्रमुख ह.भ.प. दुर्गादास महाराज यांचे हार घालुन स्वागत केले . या प्रसंगी पंचायत समिती माजी सभापती डॉ. नरेंद्र कोल्हे , मोहन इंगळे , राजेंद्र राणे , चंद्रकांत तळेले , के . टि. तळेले सर . व ईतर मान्यवर उपस्थित होते .

 

Oplus_131072

सदर पायी वारी चोविस दिवस मजल दर मजल करीत आषाढि एकादशिला पंढरपूर येथे पोहोचणार आहे दिंडीचे नेतृत्व दुर्गादास महाराज नेहते करीत असून विणेकरी ची जबाबदारी भगवान महाराज खानापूर यांचेकडे आहे या वर्षी परीसरातील शेकडो वारकरी यांनी ज्ञानोबा तुकाराम च्या गजरात पंढरपुरकडे प्रस्थान केले . शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी दरवर्षी या वारीत सहभागी होतात . प्रत्येक मुक्काम ठिकाणी ग्रामस्था कडून वारकऱ्या चे स्वागत केले जाते . या आनंदमय सोहळ्यात महिला भाविक सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होतात . या प्रसंगी संपूर्ण बामणोद गाव भक्ती मय वातावरणणत न्हावुन निघाले होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या