महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत श्री स्वामिनारायण गुरुकुल विद्यालयाची घवघवीत कामगिरी; विद्यार्थ्यास सुवर्णपदक.

भुसावळ- खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (MTS) दिनांक जानेवारी 2026 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत श्री. स्वामिनारायण गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय संपादन करून शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थी चि. रुद्र राजेंद्र राणे याने सर्वाधिक गुण प्राप्त करून *स्कूल गोल्ड मेडल* पटकावले. तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट यश मिळवून प्रमाणपत्रे प्राप्त केली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संचालक गोपाळ भगतजी यांनी त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक मनोज भोसले , अभिष सरोदे , मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी , मा. उज्वला धांडे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे विद्यालयात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

