Friday, June 26, 2026
Homeजळगावभुसावळात पाण्यासाठी रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्यांना ‘रेल कामगार सेने’चा घेराव;

भुसावळात पाण्यासाठी रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्यांना ‘रेल कामगार सेने’चा घेराव;

भुसावळात पाण्यासाठी रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्यांना ‘रेल कामगार सेने’चा घेराव;

टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन.

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

येथील रेल्वेच्या झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये (झेडआरटीआय मध्ये) गेल्या अनेक दिवसांपासून प्रशिक्षणार्थींना पिण्याच्या आणि दैनंदिन वापराच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे.या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना मा.खासदार,केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत,सरचिटनिस दिवाकर देव व कार्याध्यक्ष संजय जोशी यांचे आदेशाने ‘रेल कामगार सेने’च्या भुसावळ शिष्टमंडळाने आक्रमक पवित्रा घेतला.कार्यकर्त्यांनी झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य रामनिवास मीना यांची भेट घेऊन तात्काळ पाणी समस्या सोडवण्याची आग्रही मागणी केली.

रेल्वे प्रशिक्षणार्थींना पिण्याच्या पाण्यासह आंघोळ आणि इतर दैनंदिन वापरासाठीही पाणी मिळत नसल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. या घेराव आंदोलनादरम्यान केवळ पाणीच नव्हे, तर झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील जिमची काही प्रमाणात दुरावस्था आणि खानावळीतील (मेस) व होस्टेल मधील अस्वच्छतेच्या समस्येबाबतही प्राचार्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्राचार्यांचे आश्वासन

आंदोलनाचा वाढता दबाव पाहून प्राचार्य रामनिवास मीना यांनी सकारात्मक भूमिका घेतली.जोपर्यंत पाणी पुरवठा पूर्ववत होत नाही,तोपर्यंत रेल्वे तर्फे प्रशिक्षणार्थींसाठी टँकरद्वारे पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.तसेच मेसमधील जेवण आणि स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जाईल,अशी ग्वाहीही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.या आंदोलनात रेल कामगार सेन�

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या