Friday, June 26, 2026
Homeआरोग्यभुसावळ विभागात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन कार्यक्रम

भुसावळ विभागात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन कार्यक्रम

भुसावळ विभागात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन कार्यक्रम

भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

रेल्वे विभागामध्ये २५ जुन रोजी कृष्णचंद्र सभागृह, भुसावळ येथे अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा समाजसेविका डॉ. वंदना मॅडम यांनी उपस्थितांना अमली पदार्थांच्या व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या गंभीर परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्यचे जळगाव जिल्हा संघटक प्रा. डॉ. दयाघन एस. राणे यांनी रासायनिक अमली पदार्थांचे सेवन, त्यापासून निर्माण होणारे व्यसन आणि त्याचे आरोग्य व सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत आपले विचार व्यक्त केले. त्यांनी अमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनजागृती आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

दोन्ही मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली “अमली पदार्थांचे सेवन न करण्याची शपथ” प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी उपस्थितांना दिली. यावेळी उपस्थित रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ ग्रहण करून अमली पदार्थमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रवीण कुमार पाठक, विभागातील इतर अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर जनजागृती सत्रात सुमारे २०० कर्मचारी सहभागी झाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या