Wednesday, July 1, 2026
Homeजळगावभूकरमापक १५ हजाराची लाच् घेताना रंगेहात पकडला गेला.

भूकरमापक १५ हजाराची लाच् घेताना रंगेहात पकडला गेला.

भूकरमापक १५ हजाराची लाच् घेताना रंगेहात पकडला गेला.

लाच लूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           दि.१

जळगाव येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भुकर मापक जितेंद्र प्रकाश पाटील १५ हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडला गेल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मुळ तक्रारदार यांचे जळगाव शहरात वडिलोपार्जित घर असुन नमुद घराचे कागदपत्रांमध्ये तक्रारदार यांचे काकांनी फेरफार करून नमुद घर हे स्वतःच्या नावे करून तक्रारदार यांचे वडीलांचे नाव कमी केले होते.त्याबाबत जिल्हा अधीक्षक,भुमि अभिलेख कार्यालय,जळगाव येथे अपिल केले असता सदर अपिलावर

नमुद नोंद रद्द होवुन तक्रारदार यांचे वडीलांचे नाव पुन्हा सदर घराचे उता-यावर लावणेबाबत दुरूस्ती करणेकरीता आदेश झालेले आहेत.म्हणुन तक्रारदार यांनी दि. २५/ १२ / २०२५ व दि.०५/०६/ २०२६ रोजी जिल्हा अधीक्षक, भुमि अभिलेख कार्यालय, जळगाव येथे झालेल्या आदेशाप्रमाणे सदरची रद्द

झालेली नोंद ७/१२ उता-यावर अदयावत करून मिळणेबाबत विनंती अर्ज केलेले होते. परंतु त्यावर अदयाप कोणतीही कारवाई झालेली नाही.म्हणुन तक्रारदार दि.१८/०६/२०२६ रोजी संबंधीत

कार्यालयात जावुन त्यांचे कामाबाबत चौकशी केली असता, तेथे तक्रारदार यांना आलोसे जितेंद्र प्रकाश पाटील, भुकरमापक यांनी सांगितले की, तुमचे काम मी साहेबांशी बोलुन करून देईल. परंतु त्यासाठी तुम्हाला आमचे साहेबांसाठी माझेकडे १०,००० /- रूपये दयावे लागतील व मला तुमचे ईच्छेप्रमाणे पैसे देवुन टाकाल असे सांगून १०,००० /- रूपये लाचेची मागणी केली होती. म्हणुन दि. २५/०६/२०२६ रोजी तक्रारदार यांनी आलोसे जितेंद्र पाटील यांचेविरूध्द ला.प्र.वि. जळगाव यांचेकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने केलेल्या लाचमागणी पडताळणी केली असता,आलोसे जितेंद्र प्रकाश पाटील,भुकरमापक यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित काम करून देण्यासाठी त्यांचे

साहेबांकरीता १०,००० /- रूपये व स्वत: करीता ५,०००/- लाचेची मागणी करून ती स्विकारण्यास

पंचासमक्ष समंती दर्शविली होती.

तसेच आजरोजी आयोजित केलेल्या यशस्वी सापळा कारवाईदरम्यान आलोसे जितेंद्र प्रकाश पाटील भुकरमापक, जिल्हा अधीक्षक,भुमि अभिलेख, जळगाव यांनी तक्रारदार यांचे कडुन १५,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांचे विरूध्द जिल्हापेठ पोलीस स्टेशन

येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास अधिकारी

प्र.वि. जळगांव- योगेश ठाकूर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि. जळगांव भारत तांगडे,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र,नाशिक.प्रदिप मैराळे, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र,नाशिक.श्रीमती कविता फडतरे, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र,नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी- योगेश ठाकुर, पोलीस उप अधिक्षक,ला.प्र.वि.,जळगांव.

सापळा अधिकारी श्रीमती रेश्मा अवतारे,पो.नि.ला.प्र.वि.नंदुरबार, कॅम्प – जळगांव.सापळा पथक हेमंत नागरे,पोलीस निरीक्षक,

श्रे.पोउप निरी.सुरेश पाटील,

मपोहेकॉ / संगिता पवार,पोकॉ/राकेश दुसाने, पोकॉ/ प्रदिप पोळ, पोकॉ/ मनोज पाटील हे करीत आहेत.

लाचलुचपत विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबधी काही माहीती असल्यास अगर लाच मागणाऱ्या

लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र नाशिक येथे सपंर्क करावा.

सपंर्क पत्ता

संकेतस्थळ

:- ला.प्र.वि.कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव

:- acbmaharastra.gov.in

ई मेल / ऑनलाईन तक्रार :- spacbnashik@mahapolice.gov.in,

dyspacbjalgaon@gmail.com

दुरध्वनी क्रमांक

:- ०२५७-२२३५४७७

संपर्क क्रमांक :-

१. ला. प्र. वि. जळगाव

२. ला.प्र.वि. नाशिक

३. ला. प्र. वि. अहिल्यानगर

४. ला.प्र.वि. धुळे

५. ला. प्र. वि. नंदुरबार

व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ७५८८६६१०६४

व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ९५४५६५१०६४

व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ९१६८६४१०६४

व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ७७९८१६१०६४

व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ९४२३५४१०६४

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या