२० वर्षाचा तरुण विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू.

शिरसाड येथील घटना.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१ तालुक्यातील शिरसाड येथील वीस
वर्षाचा तरुण विहिरीत डोकावत असताना अचानक तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत यावल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शिरसाड येथील राजेश रमेश भिलाला वय २० हा
त्याचे घरासमोरील विहिरीत मंगळवारी डोकावत पहात असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो विहिरीत पडून
पाण्यात बुडाल्याने मयत झाला हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच
नागरिकांनी तत्काळ त्याला विहिरीच्या बाहेर काढले आणि यावल येथील ग्रामीण रुग्णालयात
उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले आहे या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे,
याबाबतची खबर यावल पोलीस स्टेशनला रमेश भिलाला याने दिल्यावरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार रोहिल गणेश करीत आहेत.

