लाचखोर सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, वर्ग-१, अकोला याच्या घरातून २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयाचा मुद्देमाल जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केला.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.३
अकोला येथील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी हा दि.२६ जून २०२६ रोजी दहा हजार रुपयाची लाच घेताना रंग हात पकडला गेला होता आणि त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चौकशी दरम्यान दि.२ जुलै २०२६ रोजी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील घरातून २ कोटी ९४ लाख ६४ हजार रुपयाचा मुद्देमाल आढळून आल्याने तो मुद्देमाल जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केल्याने जळगाव व अकोला जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली.
सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या घरात सोन्याचांदीचे दागिने व प्रॉपर्टीचे,मौल्यवान वस्तू कागदपत्र आढळून आले ते पुढील प्रमाणे
१. १,५३,८४,६३० /- रू. रोख रक्कम,
२. ६०,५७,१३५/- रू. कि. अं. चे एकुण ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने.
३ ) ३.६२,१३,३७६ रू. किं.चे वेगवेगळया ठिकाणी आलोसे व त्यांचे
कुटुंबियांचे नावे प्रॉपर्टी असल्याचे कागदपत्रे,
४ ) ३१,४१६ /- रू. कि. अं.चे एकुण १५४.५०० ग्रॅम चांदीचे दागिने,
५ ) ११,५२,७४५ /- रू. किं. चे एकुण सोने खरेदी केल्याच्या पावत्या.
६ ) ६,२५,५४५/- रू. किं. च्या घरातील वस्तु. एकुण २,९४,६४,
८४७ /- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला असुन तो जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यातील लोकसेवक किरण पुरुषोत्तम चौधरी, वय ५७ वर्ष, व्यवसाय नोकरी, सहजिल्हा निबंधक तथा मुंद्राक जिल्हाधिकारी, अकोला वर्ग-१ रा. प्लॉट नं. १०, साईप्रभा आर्केट, विष्णु नगर, खाजामिया रोड, जळगांव (खाते- मुंद्राक विभाग, वर्ग- १) यांनी तक्रारदार यांच्याकडुन १०,०००/- रुपये लाच रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचेविरुद्ध सिटी कोतवाली पो.स्टे. जिल्हा अकोला येथे दि.२६.०६.२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सापळा अधिकारी मिलींद कुमार बहाकर,पोलीस उपअधिक्षक ला.प्र.विभाग अकोला यांनी आरोपी लोकसेवक यांचे राहते घर जळगांव येथे असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १८६ प्रमाणे ठराव पाठवुन घरझडती
घेणे बाबत ला.प्र.वि. घटकास कळविले होते.ला.प्र.वि.जळगांव कडील घरझडती पथक तात्काळ आलोसे किरण पुरुषोत्तम चौधरी यांचे राहते घरी घरझडतीसाठी गेले असता सदरचे घर बंद होते.
त्यावेळी सदर घर पंचांसमक्ष सिलबंद करण्यात आले होते. त्यादरम्यानच्या काळात दि.२८.०६.२०२६ रोजी रात्री ०२.०० वा.चे सुमारास आलोसे यांचे नातेवाईक यांनी नमुद सिलबंद असलेले घराचे मागील गॅलरीचे दरवाजाचे कुलुप
तोडुन घरफोडी करण्याच्या व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आत प्रवेश केला होता,तेव्हा त्यांना ला.प्र.वि.जळगाव घटकाचे अधिकारी व कर्मचारी तसेच
स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याबाबत पो. नि.स्मिता नवघरे, ला.प्र.वि. जळगांव यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने जिल्हापेठ पो. स्टे.गुरंन २०७ / २०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ ( अ ), ३३१ (२), २३८,६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दि.०२.०७.२०२६ रोजी आलोसे किरण चौधरी यांची पत्नी सौ.मनिषा चौधरी या जळगांव येथे हजर झाल्याने त्यांचेसमक्ष व दोन शासकिय पंच, गोल्ड व्हॅल्युअर, बॅक कॅशियर,डॉक्टर यांचेसमक्ष आलोसे यांचे राहते घरी साई
प्रभा ऑर्केड, विष्णुनगर, जळगांव येथील घरझडती मध्ये वरप्रमाणे रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागीने, पावत्या व स्थावर प्रॉपर्टीचे कागदपत्रे मिळुन आले असुन ते जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
प्रदिप मैराळे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक परिक्षेत्र,नाशिक.श्रीमती कविता फडतरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली
पर्यवेक्षण अधिकारी :- योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. घरझडती अधिकारी :- योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव,
श्रीमती. स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.
घरझडती व मदत पथक :- पो. नि. रेश्मा अवतारे, श्रे. पोउनि / सुरेश पाटील, पोहेकॉ / किशोर महाजन, पोकॉ/सचिन चाटे, पोकॉ/ मनोज पाटील, पोकॉ/ अमोल सुर्यवंशी, पोकॉ / राकेश दुसाने, पोकॉ/ भुषण पाटील, पोकॉ/ प्रदीप पोळ, पोकॉ / प्रणेश ठाकुर सर्व नेमणुक – ला.प्र.वि., जळगाव. यांनी केल्याने अकोला व जळगाव जिल्ह्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहीती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क करावा.संपर्क पत्ता :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव.
संकेतस्थळ :- acbmaharashtra.gov.in
ई-मेल:-spacbnashik@mahapolice.gov.in, dyspacbjalgaon@gmail.com ऑनलाईन तक्रार :- acbmaharashtra.net
टोल फ्रि क्रमांक: :- 1064
दुरध्वनी क्रमांक :- 0257-2235477
संपर्क क्रमांक :- व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ७५८८६६१०६४
व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ९५४५६५१०६४
व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ९१६८६४१०६४
व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ७७९८१६१०६४
व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ९४२३५४१०६४

