यावल तालुक्यात विभागीय आयुक्त प्रवीणकुमार गेडाम यांनी भेट दिली परंतु तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांपासून माहिती लपविली.

<img class

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.३
नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी शुक्रवार दि.३ रोजी यावल तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात भेट देऊन शासकीय कामकाजाची पाहणी केली असली तरी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती मिळू नये म्हणून प्रसिद्धी माध्यमांना कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही,आयुक्तांनी आढावा काय घेतला.? आणि काय महत्त्वाच्या सूचना दिल्या.? ही माहिती लपवून ठेवल्याने तालुक्यात शासकीय कामकाजाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
पंचायत समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत शासनाच्या योजना व प्रलंबित काही कामं संदर्भात नागरिकांच्या तक्रारी ज्या आहेत त्या संदर्भात आणि विभागनिहाय कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन काही अधिकाऱ्यांच्या कामकाजामधील त्रुटींबाबत कानउघाडणी केली.
आढावा घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधांबाबत आणि आलेल्या तक्रारींवर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.
आयुक्त गेडाम यांनी शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे असे स्पष्ट निर्देश देत कामातील अनियमितपणा, कामकाजात दिरंगाई सहन केली जाणार नाही, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिला.नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे,शासकीय काम पारदर्शक पद्धतीने करावे इत्यादी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
बैठकीदरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना शासकीय कामकाजात येणाऱ्या अडचणी सुद्धा ऐकून त्यावरील उपाययोजनांसाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. नागरिकांना शासकीय सेवांसाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे, चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले कामकाज वेळेवर करावे असे आयुक्तांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर,अतिरिक्त जिल्हाधिकारी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,नायब तहसीलदार गांगुर्डे,गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी दीपक कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावल तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी आणि केल्याने अधिकारी कर्मचारी वर्गाची चांगलीच धांदल उडाली.
यावल तालुक्यात विभागीय आयुक्त प्रवीण कुमार गेडाम येणार असल्याची तसेच विभागीय आयुक्त साहेबांनी ग्रामीण व शहरी भागाच्या अडीअडचणी संदर्भात महत्त्वाच्या काय सूचना दिल्या.? कोणकोणत्या कामांचा,तक्रारीचा आढावा घेतला इत्यादी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना न देता गोपनीयता बाळगल्याने यावल तालुक्यातील शासकीय कामकाजाबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.

