जिल्हा परिषदेतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ अंतर्गत दोन दिवसीय उजळणी प्रशिक्षण सुरू
जळगाव: खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
ग्रामीण आणि शहरी भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ येथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रायमरी हेल्थ केअर’ (CPHC) अंतर्गत हे दोन दिवसीय उजळणी प्रशिक्षण (Refresher Training) राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राबविण्यात येत आहे.
या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट माता व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार (NCD), तसेच मानसिक आरोग्य यांसारख्या विविध आरोग्य सेवांबाबत कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्ये अद्ययावत करणे हे आहे.
प्रशिक्षणाची ठळक वैशिष्ट्ये:
सहभागी: वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक/सेविका आणि आशा स्वयंसेविका.
वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
विषय: गरोदरपणातील काळजी, नवजात शिशु आरोग्य, कुटुंब नियोजन, मौखिक आरोग्य, मानसोपचार, नेतृत्व कौशल्य आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांसह विविध आरोग्य विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

<img class


