भुसावळ नगरपरिषदेत रिपब्लिकन सेनेचे आक्रमक ‘मटके फोडो’ आंदोलन; अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा थेट इशारा

<img class

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
“शेळगाव बॅरेज व हतनुर धरणामध्ये मुबलक पाणी असूनही केवळ नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे भुसावळकरांवर पाणीटंचाई ओढवली आहे. जनतेला पाणी नाही हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही,” अशी आक्रमक भूमिका रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी मांडली. रिपब्लिकन सेनेने दिलेला ४८ तासांचा अल्टिमेटम संपताच, आज शुक्रवार ३ जुलै रोजी दुपारी १२:०० वाजता नगरपरिषदेत धडक ‘मटके फोडो’ आंदोलन करण्यात आले.

प्रमुख मागण्या :
१) पाणीपुरवठ्याचे ‘रोस्टर’ तात्काळ जाहीर करा.
२) आलम-जेली’चा साठा आणून नागरिकांना स्वच्छ पाणी द्या.
३) हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकार्यांची चौकशी करून कारवाई करा.
यासह विविध समस्या बाबत नगरपालिका प्रशासनाने
लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागला नाही, तर तीव्र ‘ठिय्या आंदोलन’ सुरू करून जबाबदार अभियंत्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा कडक इशारा विनोद सोनवणे यांनी दिला.
आंदोलनामध्ये विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष, वंदनाताई सोनवणे रिपब्लिकन महिला सेना जिल्हाध्यक्षा, वंदनाताई आराक रिपब्लिकन महिला सेना जिल्हा महासचिव, देवदत्त मकासरे (मेजर) जिल्हा उपाध्यक्ष, लिलाधर सपकाळे भुसावळ शहराध्यक्ष, स्वप्नील सोनवणे आय टी प्रमुख, बंटी नरवाडे,शर्मिला तायडे,उषा पाटील,विक्रम वानखेडे,पंकज नरवाडे,भारत गोफणे,दिपक सुरवाडे, दिलीप क्षिरसागर, विशाल नरवाडे,विजया वाघोदे,मिना भालेराव,पंकज बोदडे, नानु सुर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

