Wednesday, September 16, 2026
Homeआंदोलनसर्वपक्षीय जनआंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनाची मागणी

सर्वपक्षीय जनआंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनाची मागणी

सर्वपक्षीय जनआंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनाची मागणी

चोपडा |  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या विरोधातील विविध तक्रारी, कथित अवैध गौण खनिज उत्खननाकडे दुर्लक्ष आणि विभागीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी रविवारी (२९ जून) चोपडा शहरात सर्वपक्षीयांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तहसीलदारांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली.

सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयाकडे मार्गक्रमण करणाऱ्या आंदोलकांच्या वतीने अमळनेर प्रांत कार्यालयाचे प्रतिनिधी तथा नायब तहसीलदार श्री. जोशी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी त्यांनी निवेदनातील सर्व मागण्या तातडीने शासनाकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन आंदोलकांना दिले.

आंदोलनादरम्यान गोपाळराव सोनवणे, बाळासाहेब पाटील, शशिकांत देवरे, अमृतराव वाघ, मगन बाविस्कर, दीपक सोनवणे, शुभम सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त करत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आणि त्यांच्यावर विभागीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी लावून धरली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नरेंद्र पाटील, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका संध्या महाजन, चोसाका चेअरमन चंद्रहास गुजराथी, माजी सभापती नारायण शालीग्राम पाटील, मनसेचे अनिल वानखेडे, प्रदीप पाटील, मगन बाविस्कर, रवींद्र मराठे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे सुनील बडगुजर, शशिकांत कन्हैये, नंदलाल चौधरी, अमृतराव वाघ, शशिकांत देवरे, संजय कानडे, अजय पालीवाल, शशिकांत पाटील, भारतीय पत्रकार महासंघाचे विभागीय अध्यक्ष विलास पाटील, जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भरत धनगर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष किशोर दुसाने, अमोल राजपूत, समाधान पाटील, निलेश बारी, विकी सिंधी, तुकाराम पाटील, प्रल्हाद पाटील, शामकांत परदेशी, उर्वेश साळुंखे, प्रफुल्ल स्वामी, मुन्ना शर्मा, तुळशीराम पाटील, नगरसेवक डॉ. रोहन पाटील, गटनेते गजेंद्र जयस्वाल, गिरीश देशमुख, रणजीत देशमुख, लहूश धनगर, सुनील सोनगिरी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक सहभागी झाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या