सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचे ओपन स्पेस जागेवर अतिक्रमण.

प्लॉट धारकांची तक्रार परंतु कारवाई शून्य.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१०
येथील कृष्ण तारा नगर मधील सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूलने खुल्या भूखंडावर अतिक्रमण केल्याची तक्रार गट नंबर ७५६ मधील प्लॉट धारकांनी केली असली तरी अद्याप अतिक्रमण न काढल्याने नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याची शहरात चर्चा आहे.
गट नंबर ७५६ मधील तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रार अर्ज नमूद केले आहे की आम्ही यावल येथील कायम स्वरूपी रहिवाशी असून
मौजे यावल येथील गट नं. ७५६ मधील खुला भुखंड ओपन स्पेस या रिकामा जाग्यावर पत्री
शेड व अनधिकृतरित्या बांधकाम करणारे सरदार वल्लभ भाई पटेल शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे अध्यक्ष व सभासदांनी आप- आप सात संगनमत करून बांधकाम व पतरी शेडचे काम केलेले आहे कोणत्याही प्रकारचे बांधकामाची व पत्री शेडाची नगर पालिके कडुन कोणतेही स्वरूपाची परवानगी न घेता काम करण्यात आले आहे.
तरी वरील न.प.चे मालकीचे खुले भुखंड व ओपन स्पेसवर पत्री शेडचे काम झालेले असून
सदरहु गैर कायदेशीर कामाचे अतिक्रमण काढून प्लॉट धारकांना न्याय द्यावा.व सरदार वल्लभ भाई पटेल शाळेचे मुख्याध्यपक व संस्था चालक यांची चौकशी करून
कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
नगरपरिषदेच्या खुले भुखंड व ओपन स्पेसवर गैर कायदेशीर काम झाल्या मुळे शहरातील दोन समाजात तणाव निर्माण होऊन दंगली होऊ नये म्हणुन नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून त्वरित कारवाई अशी मागणी केली होती आणि आहे.
यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांनी गेल्या वर्षी ३१ जुलै २०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांना तक्रारीच्या संदर्भाने लेखी पत्र देऊन यावल नगरपरिषद हद्दीतील गट नंबर ७५६ मधील ओपन स्पेस वर अतिक्रमण व बेकायदेशीरपणे पत्राचे कंपाउंड उभारणी केले असल्याचे नमूद करून नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसाच्या आत गट नंबर ७५६ मधील ओपन स्पेस वरील असलेल्या अतिक्रमण व बेकायदेशीरपणे उभारलेले पत्र्याचे कंपाउंड काढण्यात यावे व सदर कार्यवाही बाबतचा अहवाल नगर परिषदेत सादर करावा असा आदेश दिला होता आणि आहे. तरीसुद्धा सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल संस्था चालक व मुख्याध्यापक यांनी केलेले अतिक्रमण गेल्या वर्षभरात काढले नाही. नगरपालिकेने नोटीस दिल्यावर सुद्धा अतिक्रमण न काढल्याने त्या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत यावल नगरपरिषदेने संस्थेला खुल्या भूखंडा पैकी फक्त १० % एवढी जागा शैक्षणिक क्रीडांगण म्हणून कायमस्वरूपी वापरण्यास दिली असल्याचा ठराव क्रमांक ४७१ हा तत्कालीन नगरसेवकांनी बेकायदेशीर केला असल्याने याबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लवकरच रीतसर ( ३०८ अन्वये ) तक्रार केली जाणार असल्याची माहिती यावल नगर परिषद अध्यक्ष सौ. छायाताई पाटील दिली.

