सरदार वल्लभभाई पटेल शाळेकडून शैक्षणिक साहित्य व गणवेश घेण्याची सक्ती.

माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल !
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शैक्षणिक वर्ष २०२६/२०२७ मध्ये इयत्ता ८ वी व १० वी मधे प्रवेश घेताना सरदार वल्लभ भाई पटेल शाळा व्यवस्थापनाकडून शैक्षणिक फी,साहित्य व गणवेश घेण्याची शक्ती केली जात असल्याची तक्रार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
दि.७ जुलै २०२६ रोजी माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे श्रीमती शुभांगी नेमाडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले व माझ्या दोघ मुलांची शिक्षणाची जबाबदारी मी मजुरी करून करत आहे माझे दोघं मुलं जानवी प्रमोद नेमाडे इयत्ता १० वी, व कार्तिक प्रमोद नेमाडे इयत्ता ८ वी या वर्गात आहे दोघं मुलं पहिली वर्गापासून यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश शाळेमध्ये शिकत आहे आणि आम्हाला शैक्षणिक वर्ष २०२५ पर्यंत कुठलीही अडचण शाळेकडून आलेली नव्हती परंतु चालू शैक्षणिक वर्ष २०२६ / २७ मधे शाळेच्या व्यवस्थापकाकडून अचानक अभ्यासक्रम बदलविण्यात आला व तो अभ्यासक्रम विद्यार्थी यांना समजत नाही परत चेअरमन यांनी शैक्षणिक फी व शैक्षणिक साहित्य हे आमच्या शाळेतूनच घेण्यास पालकांना शक्ती केलेली व शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वरती शैक्षणिक वर्ष अभ्यासक्रमाचे संपूर्ण पुस्तके युनिफॉर्म व इतर साहित्य वाढीव किमती टाकून सर्व पालकांना मेसेज दिला आहे. तसेच सर्व शैक्षणिक साहित्य हे शाळेतच मिळते हे सर्व साहित्य शाळेच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही मिळत नाही याचा जाब मी शाळेच्या चेअरमन यांना विचारला असता चेअरमन यांनी मला उर्मट, दादागिरीची भाषा वापरत मला अपमानित केले मी माझ्या मुलांचे शिक्षणाविषयी प्रश्न विचारणे पालक या नात्याने जबाबदारी व माझा हक्क आहे.
तसेच चेअरमन यांनी मला मुलीचे लिविंग सर्टिफिकेट तथा दाखला आमच्या शाळेतुन घेऊन जा व कुठेही शिकवा असे साष्ट भाषेत मला उत्तर दिले व मला कुठलीही माहिती न देता माझ्या दोघ मुलांचे त्यांच्या शाळेतून लिव्हींग सर्टिफिकेट दाखला काढून
दुसऱ्या शाळेत माझ्या संमती विना नाव प्रवेश घेऊन टाकला. याबाबत शाळेत जाऊन चेअरमन यांच्याकडे विचारपूस केली असता विचारला असता त्याचा राग येऊन चेअरमन यांनी त्यांच्या जवळील असलेल्या अनेकांनी माझ्या मोबाईल नंबर वरती फोन करून दबाव आणण्याचा आणि धमकवण्याचा प्रयन्त केला.यामुळे मला याचा खुप मानसीक ताण येत आहे.
पतीचे निधन झालेले असल्याने मी व माझे दोघ मुल एकट रहातात त्यामुळे खुप भिती वाटते माझ्या दोघंही मुलांचे चालु शैक्षणीक वर्षाचे खुप नुकसान होत आहे.यामुळे मुलांनाही मानसीक त्रास होत आहे.
याच कारणाने मी आपल्याला शाळेच्या चेअरमन यांनी शैक्षणीक वाढीव फी व सक्तीने शैक्षणिक साहित्या घेण्याचा पुराव्यानिशी तक्रार करीत आहे तरी आपण तत्काळ चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी करून तक्रारीच्या प्रती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तसेच केंद्रीय व राज्य शिक्षण मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

