Sunday, July 12, 2026
Homeजळगावदगडावर साकारले 'मूल्यवर्धन' – विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेचा अनोखा उपक्रम

दगडावर साकारले ‘मूल्यवर्धन’ – विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेचा अनोखा उपक्रम

दगडावर साकारले ‘मूल्यवर्धन’ – विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेचा अनोखा उपक्रम

जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                   मानव सेवा विद्यालय, जळगाव येथे उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली “दगडावर चित्रांकन” हा नावीन्यपूर्ण मूल्यवर्धन उपक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमामध्ये सुनिल दाभाडे यांनी दगडावर सुंदर अक्षरशैलीत “मूल्यवर्धन” तसेच आकर्षक लोगो रेखाटून विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी कलाकृती साकारली. त्यांच्या प्रात्यक्षिकातून प्रेरणा घेत इयत्ता **सहावीच्या विद्यार्थ्यांनीही दगडावर “मूल्यवर्धन” हे नाव अत्यंत सुंदर व कल्पक पद्धतीने रेखाटले. विद्यार्थ्यांनी रंगसंगती, अक्षररचना आणि कलात्मक मांडणी यांचा उत्कृष्ट वापर करून आपली सर्जनशीलता सिद्ध केली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला, सृजनशीलता, सौंदर्यदृष्टी, संयम आणि आत्मविश्वास यांचा विकास होण्यास मोठी मदत झाली. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे उपस्थित शिक्षकांनी मनापासून कौतुक केले.

अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण आणि कृतीशील उपक्रम राबवून उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे विद्यार्थ्यांमध्ये कला व मूल्यसंवर्धनाची आवड जोपासत आहेत.

 


याविषयी मोलाचे शाळेच्या मुख्याध्यापिक माया अंबटकर यांचे मार्गदर्शन केले. तसेच बालवाडी मुख्याध्यापिका सौ. मुक्ता पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया व मानद सचिव श्री. विश्वनाथ जोशी यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना, आत्मविश्वास ,कला मूल्यवर्धन आवड निर्माण होईल असल्याचे सांगून कलाशिक्षक श्री. सुनिल दाभाडे यांच्या उपक्रमशील कार्याचे विशेष अभिनंदन केले.

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या विद्यार्थ्यांमध्ये कला , सृजनशीलता , सौदर्य दृष्टी यात विद्यार्थ्यांमध्ये मदत होईल असे उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले असून, शालेय जीवनात अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या