Monday, July 13, 2026
Homeजळगावपाल आश्रमातील गुरुपौर्णिमेनिमिच्या नियोजनार्थ रावेर ला प्रशासकीय बैठक

पाल आश्रमातील गुरुपौर्णिमेनिमिच्या नियोजनार्थ रावेर ला प्रशासकीय बैठक

पाल आश्रमातील गुरुपौर्णिमेनिमिच्या नियोजनार्थ रावेर ला प्रशासकीय बैठक                                           रावेर खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी                           रावेर तालुक्यातील पाल येथील परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी श्री वृंदावन धाम आश्रमात सालाबादाप्रमाणे यंदाही दी. २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य आयोजन करण्यात येत असून दरवर्षाप्रमाणे यावर्षी ही किमान लाखो चैतन्य साधक परिवारासह भाविक भक्तांची देशभरातून आठ ते नऊ राज्यातून मंदियाळी राहणार असल्याने त्यांच्या

 

नियोजनार्थ शासकीय यंत्रणा सुसज्जीत करण्याकरिता जसे रावेर ते पाल कुसुम्बा मार्गे रस्त्याची डागडुगी करणे,सावदा मार्गे बोरघाट रस्त्यावरून पाल आश्रमात येणाऱ्या पायी दिंडी ला संरक्षण तसेच भाविकांच्या वाहनांना सहकार्य करणे, दी. २८ ते २९ तारखेच्या सायंकाळी पर्यंत आगारातून एस टी जादा बसेस सोडण्यात यावी,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता अतिरिक्त पोलीस यंत्रणा सज्ज करणे., गुरुपौर्णिमेच्या दोन दिवसा आधीपासून रस्ते, गटारी, साफ सफाई तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. ठिकठिकाणी गावात लाईट लावणे. कचरा कुंडीची व्यवस्था करणे.अग्निशामक, व महावितरण तर्फे विजेचा पुरवठा अखंडीत सुरु ठेवणे.आरोग्य केंद्रातर्फे भाविक रुग्णांना तपासणी व उपचाराकरिता आश्रम परिसरात कॅम्प लावणे.अश्या विविध यंत्रणा राबविण्याकरिता रावेर येथील शासकीय विश्राम गृहात संत श्री श्याम चैतन्य जी महाराज यांच्या अध्यक्ष व आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनात दी. १३ जुलै रोजी तालुक्यातील सर्व

 

स्तरावरील अधिकाऱ्यांची आढावा बैठक संम्पन्न झाली.या वेळी बैठकीत रावेर तहसीलदार दीपाली जेथे मॅडम ,बी .डी.ओ मेढे,पोलीस निरीक्षक संदीप पाटील,सर्वजिक बांधकाम चे ब्रम्हानंद तायडे, महावितरण चे उपकार्यकारी अभियंता नितीन सूर्यवंशी,एस टी महामंडळाचे तडवी, तसेच आरोग्य केंद्र,वनविभाग आदी अधिकारी सह ओ के पवार,स्वामी परिवाराचे रवींद्र पवार, आदी उपस्थित होते.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संत श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी गुरू शिष्याचे नातं अतूट असते आणि त्यातून आपण सर्व गुरुदेवांचे शिष्य आहोत तर आपले काही तरी देणं लागते म्हणून सर्वांनी मिळून आपल्या कर्तव्याचे पालन करून निस्वार्थ सेवा करणे हीच आपली सर्वात मोठी भक्ती मानली जाईल तसाच योग परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी पाल वृंदावन धाम आश्रमात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या महोत्सवात घडून येत असून सर्वांनी या सेवाकार्यात भाग घेऊन आपले जीवन धन्य करावे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या