Tuesday, July 14, 2026
Homeगुन्हामोटर सायकलवरून बेकायदा "गोमास" वाहतूक करणारा शांतता कमिटी सदस्याने पोलिसाला पाहून भर...

मोटर सायकलवरून बेकायदा “गोमास” वाहतूक करणारा शांतता कमिटी सदस्याने पोलिसाला पाहून भर रस्त्यावर फेकले गोमास.

मोटर सायकलवरून बेकायदा “गोमास” वाहतूक करणारा शांतता कमिटी सदस्याने पोलिसाला पाहून भर रस्त्यावर फेकले गोमास.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               दि.१४
यावल पोलीस स्टेशन पासून पाच किलोमीटर अंतरावर फैजपूर रोडवर चितोडा गावाजवळ मोटर सायकल वरून बेकायदा गोमास वाहतूक करीत असताना यावल पोलिसांला आढळून आल्याने त्याला हटकले असता मोटर सायकल चालकाने ते १० किलो गोमास भर रस्त्यावर फेकून पळाल्याने त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.गोमास वाहतूक करणारा हा शांतता समिती सदस्य असल्याची संपूर्ण यावल शहरात चर्चा आहे.

यावल पोलीस स्टेशनला पो.कॉ. अनिल साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की मंगळवार दि.१४ जुलै २०२६ सकाळी ९ वाजेच्या सुमारास चितोडा गावाच्या शिवारात यावल फैजपूर रोडवर एसटी बस स्टॉप जवळ आरोपी सईद शहा रहेमान शहा वय ५५ रा.खिर्नीपुरा यावल याने त्याचे ताब्यातील बजाज प्लेटिना मोटरसायकल वरून अवैधरित्या २ हजार किमतीचे दहा किलो वजनाचे गोमासची वाहतूक करीत असताना यावल पोलिसांनी वाहन थांबविण्यास सांगितल्याने सईद शहा याने गोमास ची गोणी रोडवर फेकून मोटरसायकल सह पळून गेल्याने यावल पोलीस स्टेशनला गु. र. नं. २५५ / २०२६ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम
१९७६ ( २०१५ चे सुधारणा सह )
कलम ५ – क , कलम ९ अ प्रमाणे दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.हे.का. उमेश महाजन करीत आहे.

गोमास गोरख धंद्यात मागील प्रकरणात सुद्धा शांतता समिती सदस्याचे नाव आणि आजच्या प्रकरणात सुद्धा शांतता समिती सदस्य असल्याची चर्चा असल्याने शांतता समिती सदस्यांमध्ये बेकायदा / अनधिकृत दोन नंबरचे धंदे व्यावसायिक करणारे कोण कोण आहेत.? त्यांना शांतता कमिटी सदस्य सुद्धा कायम ठेवून यावल शहराची कायदा सुव्यवस्था जातीय सलोखा शांतता कायम ठेवली जाणार आहे का.? अशी यावल शहरात चर्चा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या